इतर

एकदरे ता अकोले येथे ओम श्री मोखाजी बाबा यात्रा उत्सव संपन्न.

अकोले प्रतिनिधी

  अकोले तालुक्यातील एकदरे येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी मोखाजी बाबा यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.

 एकदरे,चंदगीरवाडी,पिंपळदरावाडी,जायनावाडी समस्थ ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून ओम श्री मोखाजी बाबा कृपेने सालाबादप्रमाणे समस्थ गावकऱ्यांच्या व मोखाजी बाबा आदिवासी सामाजिक सेवा संस्था यांच्यावतीने यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सर्व भाविकांनी, दुकानदारांनी तसेच रसिक मंडळी पैलवान यांनी यात्रेची शोभा वाढवली.पहिल्या दिवशी सकाळी भव्य अशी ढोल ताश्याच्या गजरात मोखाजी बाबा मूर्ती मिरवणुक काढण्यात आली.दुसऱ्या दिवशी देवाला कपडे धोतर,शाल,टोपी,चोळी,फडकी,हे कपडे चढवून देवाचा मांडव करण्यात आला.त्यानंतर मूर्तीची स्थापना करून सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला.रात्री जागरण गोंधळ मल्हारीचा कार्यक्रम करण्यात आला.तिसऱ्या दिवशी सकाळी नवस फेडण्याचा कार्यक्रम झाला.चौथ्या दिवशी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र एकदरे येथे जण जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.संध्याकाळी भिमाशंकर भजनी भारुड मंडळ यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला.पाचव्या दिवशी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यात्रेनिमित्त बहुसंख्येने भाविकांनी गर्दी केलीहोती.नवसाला पावणारा मोखाजी बाबा सर्वांचे श्रद्धास्थान येथे इतर दिवशी म्हणजे गुरुवारी महाराष्ट्रातून भाविक दर्शनाला येत असतात.यावेळी यात्रा कमिटी तसेच सर्व भाविक भक्तांनी दुकानदार,रहाट पाळणा,कुस्ती पटू,सर्व गावकऱ्यांनी या यात्रेचा आनंद घेतला.यात्रेसाठी चार दिवस दान करणाऱ्या व देणगीदारांचे यात्रा कमिटी कडून आभार मानण्यात आले.

–=====-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button