संगमनेर येथील डॉ.सोमनाथ मुटकूळे यांच्या नाटयपुस्तकाला पारितोषक जाहीर

संगमनेर प्रतिनिधी
बडोदा साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात येणारा नाटय लेखनासाठीचा प्रथम क्रमांकाचे पारितोषक संगमनेर येथील नाटयलेखक ड़ॉ.सोमनाथ मुटकूळे यांच्या राजश्री आणि इतर नाटके या नाटयपुस्तकाला पारितोषक जाहीर करण्यात आले असल्याचे साहित्य संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.या पारितोषक मिळाल्याबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
चपराक प्रकाशनाच्या वतीने मागील वर्षी राजश्री आणि इतर नाटके,निवडूंग आणि इतर नाटके,चक्र आणि इतर नाटके अशी एकूण दहा नाटकाचे लेखन केले असून ,ती प्रकाशित झाली आहे.तसेच सदरची नाटके ही रंगमचावर देखील सादर केली आहे.तसेच सावित्रबाई फुले यांच्या जीवना आधारित एकपात्री प्रयोग त्यांनी पाचशेपेक्षा अधिक सादर केली आहेत.त्यांनी सादर केलेल्या विविध नाटकातील भूमिकासाठी त्यांना यापूर्वी विविध संस्थाच्या वतीने त्यांना गौरवण्यात आले आहे.
त्यांना मिळालेल्या या पारितोषकाबददल त्यांचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात.आ.सत्यजित तांबे, आमदार सुधीरजी तांबे,दुर्गाताई तांबे,संदीप वाकचौरे,चपराक प्रकाशनाचे घनश्याम पाटील यांनी अभिनंदन केले आहे.



