जेष्ठ चित्रकार व्ही एस कुलकर्णी १०० वर्षाचे झाले, वुमन्स आर्टिस ग्रुप कडून त्यांचा सन्मान
वुमन्स आर्टिस ग्रुप तर्फे ज्येष्ठ चित्रकार व्ही एस कुलकर्णी सरांचा शंभरावा वाढदिवस साजरा केला
जेष्ठ चित्रकार व्ही एस कुलकर्णी १०० वर्षाचे झाले, yaa या निमित्ताने वुमन्स आर्टिस ग्रुप अध्यक्षा
हस्ते
शिल्पकार सीमा खेडकर शिर्के हस्ते न त्यांचा सन्मान चित्रकार व्ही एस कुलकर्णी १०० वर्षाचे झाले, वुमन्स आर्टिस ग्रुप कडून त्यांचा सन्मान
शिल्पकार सीमा खेडकर शिर्के,शिल्पसम्राट शिल्पकार बी आर खेडकर यांच्या प्रेरणेने 2014 मध्ये वुमन्स आर्टिस्ट ग्रुपची स्थापना झाली. या ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणजे पदवीधर महिला कलाकार आणि छंद वर्ग असलेल्या महिला कलाकार यांचा सुरेख संगम आहे. या ग्रुप द्वारे अनेक कार्यशाळा घेत असतो. रामकृष्ण मठ, अनाथालय, वृद्धाश्रम तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी विना मोबदला त्यांना कलेचे शिक्षण दिले जाते . कलेची आवड निर्माण होण्यासाठी त्यांना कलेचे साहित्य पुरवने .समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून अनेक संस्थांना आणि गरजू लोकांना आम्ही खारीचा वाटा देत असतो.
वर्षातून एकदा ग्रुपचे कला प्रदर्शन असते. आमच्या ज्ञानात अजून भर पडण्यासाठी शैक्षणिक सहल ही आम्ही काढतो. असा आमचा महिला कलाकारांचा ग्रुप भारतामध्ये कुठेही नाही. सप्टेंबर 2025 मध्ये या ग्रुपमधील आम्ही पाच जनींनी जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे कला प्रदर्शन भरवले होते. नुकतेच वुमन्स आर्टिस्ट ग्रुपचे फेब्रुवारी 2026 मध्ये बालगंधर्वला बारावे कला प्रदर्शन झाले.सध्या या ग्रुपमध्ये 20 महिला कलाकार आहेत. वय वर्ष 28 ते 83 असा वयोगट आहे.
ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार यांना भेटी देऊन त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेत असतो. असेच एक ज्येष्ठ वास्तववादी चित्रकार व्ही.एस कुलकर्णी सर यांचा 4 जानेवारी 2026 ला 100 वा वाढदिवस साजरा झाला. त्यानिमित्ताने वुमन्स आर्टिस्ट ग्रुपने त्यांचा वाढदिवस तसेच त्यांच्या पत्नीचा 94 वा वाढदिवस साजरा केला.
कुलकर्णी सर आणि माझे वडील स्व. शिल्पकार खेडकर यांची घनिष्ठ मैत्री होती. वडिलांच्या प्रत्येक कार्यक्रमात कुलकर्णी उभयता दोघेही यायचे. कुलकर्णी सरांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि लाघवी आहे. त्यामुळेच अनेक कलाकार त्यांनी जोडले आहेत. त्यांनी त्यांच्या घराला उसीका हे नाव दिले आहे. आम्ही जेव्हा त्यांना विचारले असे नाव का दिले तर त्यावर त्यांनी सांगितले हे सर्व आहे ते त्या ईश्वराचेच आहे म्हणून उसीका असे नाव दिले आहे. वरच्याच मजल्यावर सरांच्या पेंटिंग्स चे सुंदर कलादालन आहे.
सरांच्या पत्नी शालिनी कुलकर्णी यादेखील एक चांगल्या लेखिका आहेत. मूलबाळ नाही यांची खंत न बाळगता आनंदाने जगणारे असे हे उभयता जोडपे त्यांचा आम्हा सर्वांना आदर सत्कार करता आला यात आम्ही धन्यता मानतो. या उभयतांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. अशा लोकांना भेटले, त्यांचे मार्गदर्शन घेतले , त्यांचे विचार ऐकले की एक प्रकारची ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते आणि आपल्या हातून छान कामे होतात. अशी भावना वुमन्स आर्टिस ग्रुप च्या अध्यक्षा
शिल्पकार सीमा खेडकर शिर्के पुणे.यांनी व्यक्त केल्या



