मैत्रीचे कवच तून उभी राहिली सामाजिक बांधिलकी;

अगस्ती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम!
अकोले प्रतिनिधी
शाळेतील मैत्री ही केवळ आठवणींपुरती मर्यादित न ठेवता, ती एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभी करण्याचा निर्धार समशेरपूर येथील अगस्ती विद्यालयाच्या १९९७-९८ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी केला आहे. या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या वर्गमित्रांच्या कुटुंबासाठी ‘मदतीचा हात’ हा उपक्रम सुरू केला असून, नुकतीच याची पहिली मदत सुपूर्द करण्यात आली.
मासिक बचतीतून मदतीचा डोंगर: या बॅचमधील सर्व मित्रांनी मिळून दरमहा ५०० रुपये मासिक बचत करण्याचा संकल्प केला आहे. या संकलित निधीतून ग्रुपमधील कोणत्याही सदस्याच्या मुला-मुलीचे लग्न असो किंवा अचानक ओढवलेले वैद्यकीय संकट, अशा वेळी आर्थिक आधार दिला जात आहे.
पहिले पाऊल: ३१,००० रुपयांची मदत सुपूर्द
या उपक्रमाचा श्रीगणेशा करत, ग्रुपचे वर्गमित्र श्री. बंडू सदगिर यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त त्यांना ग्रुपच्या वतीने ३१,००० रुपयांचा मदत निधी अत्यंत आपुलकीने सुपूर्द करण्यात आला. “मित्राच्या मुलीचे लग्न म्हणजे आपल्याच घरचे कार्य” या भावनेतून सर्व मित्रांनी या आनंदाच्या क्षणात आपला सहभाग नोंदवला.
केवळ लग्नसमारंभच नव्हे, तर एखाद्या मित्रावर वैद्यकीय उपचार (Medical Emergency) घेण्याची वेळ आल्यास, मुलांचे शिक्षण, मुलीचे शिक्षण,त्याला या निधीतून तातडीची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. आजच्या महागाईच्या काळात अशा प्रकारची सामूहिक मदत सर्वच मित्रांसाठी मोठे कवच ठरत आहे.

अगस्ती विद्यालयाच्या या माजी विद्यार्थ्यांच्या एकीचे आणि या अनोख्या ‘बचत गटाचे’ समशेरपूर परिसरात व शिक्षक वर्गाकडून विशेष कौतुक होत आहे.
गणेश सदगीर, अरुण बेनके, संतोष भालेराव, श्रीकांत उघडे, भिवा सदगीर, शांताराम सदगीर. शांताराम सदगीर रामदास बेनके ,राहुल बेनके, संपत सहाणे,बहिरू सदगीर, किसान मोखरे, दिपक जगताप, तुकाराम मोखरे, देवराम घोडसरे, नंदू मंडलिक, जमील शेख , दत्ता मुंढे , रामचंद्र मेंगाळ , संतोष मंडलिक ,दिपक शिंदे, खंडू ढोनर,राम कोतवाल, आशिष तळेकर, अमजद शेख, विलास दराडे ,बाळू तळपाडे, निवृत्ती ढोणर, शिवाजी बिन्नर , मार्तंड मुखेकर, गोरक्ष आव्हाड,नासिर शेख . धोंडू बेनके आदी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन हा सामजिक बांधिलकी जपण्याचे काम सुरू केले आहे.
========


