संगमनेरमध्ये कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

अॅड. सौ. ज्योती मालपाणी आणि पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे यांची प्रमुख उपस्थिती
संगमनेर दि 12
जगाला संस्कार, संवेदना आणि सामर्थ्य देणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव करण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिनानिमित्त श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या., संगमनेर आणि साहित्य कुंज मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्त्रीशक्ती गौरव सन्मान २०२६’ या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० कर्तृत्ववान महिलांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांच्या प्रेरणादायी कार्यगाथा समाजासमोर मांडण्याचा हा मनस्वी प्रयत्न आहे.
हा सन्मान सोहळा शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कृष्णा गार्डन, मेडिकव्हर हॉस्पिटल जवळ, संगमनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी मा. अॅड. सौ. ज्योती मालपाणी (समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या) आणि पद्मश्री बीजमाता राहिबाई पोपेरे (बीजसंवर्धन जननी) या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संगमनेर शहर व परिसरातील नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी आयोजित या प्रेरणादायी सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन
कार्यक्रमाचे आयोजक प्रदीपभाई शाह (संस्थापक), सीए. हर्षल गुंदेचा (चेअरमन), ललितांग शाह (संचालक), अरविंद गाडेकर (संपादक), बाळासाहेब पिंगळे (उपसंपादक ) आणि मनोज साकी (कार्यकारी संपादक) यांनी केले आहे.


