श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

श्रीरामपूर{वार्ताहर) येथील शिरसगाव परिसरातील इंदिरानगर येथील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानतर्फे गेल्या ३६ वर्षापासून विविध साहित्यिक उपक्रम होत असून एप्रिलमध्ये होणाऱ्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित संतसाहित्य संमेलनात श्रीसंत गोरा कुंभार उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन पुण्यतिथी उत्सव समिती अध्यक्षा प्रा.सौ.पल्लवी नंदकुमार सैंदोरे यांनी केले आहे.
१५ एप्रिल २०२६ रोजी प्रतिष्ठानतर्फे संतसाहित्य संमेलनात संतसाहित्य प्रबोधनपर व्याख्याने, संत कविसंमेलन, संतसाहित्य पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशने आदी कार्यक्रम होणार असून कुंभार समाजातील लेखक,कवी यांनी २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या दोन प्रती, अल्पपरिचय, आयकार्ड साईज फोटो आदी प्रत्यक्ष अथवा पोस्टाने ३० मार्च २०२६ पर्यंत डॉ. बाबुराव उपाध्ये, ‘निर्मिक’,१९१,इंदिरानगर, श्रीदत्त मंदिराजवळ, श्रीरामपूर ४१३७०९ जि. अहिल्यानगर या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन प्रतिष्ठान संस्थापक डॉ. बाबुराव उपाध्ये, कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये, उपक्रम समिती अध्यक्षा प्रा. सौ.पल्लवी सैंदोरे, उपाध्यक्ष नीतीन प्रभाकर जोर्वेकर, कार्याध्यक्ष सौ. श्रद्धा चेतन तुळे आदी पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.



