इतर

नॅब च्या नाशिक जिल्हा शाखा  अध्यक्षपदी अॅड विद्युल्लता तातेड तर सरचिटणीस पदी शितल सुराणा यांची निवड 

नाशिक प्रतिनिधी

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड ,जिल्हा शाखा, नाशिकच्या (नॅब) अध्यक्षपदी अॅड. विद्युल्लता तातेड व सरचिटणीसपदी शीतल सुराणा यांची 2026 ते 2031 या पाच वर्षांसाठी निवड करण्यात आलेली आहे. ‘नॅब’ च्या नूतन पदाधिकारी व  कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ ‘बिझनेस बे’च्या हॉलमध्ये संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  पिंपळगाव मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष श्री अशोक शहा व उपाध्यक्ष संदीप सुराणा  होते. ‘नॅब’ च्या अध्यक्षा अॅड विद्युल्लता तातेड यांनी  प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला.नॅब च्या अध्यक्षा अॅड विद्युल्लता तातेड यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात  नॅबच्या 1989 पासून च्या कार्याचा आढावा घेऊन बेळगाव ढगा येथील वृद्धाश्रमा बद्दल माहिती सांगितली. व  त्या प्रकल्पासाठी सर्वांनी उदार हस्ते देणगी देण्याचे आवाहन केले.

 नॅब चे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाशचंद्रजी सुराणा यांनी  आपल्या भाषणात बेळगाव ढगा येथील वृद्धाश्रमांसाठी अनेकांनी उदारहस्ते  दिलेल्या देणग्यांचा   उल्लेख करून ह्या कार्यासाठी सर्वांनी दिलेल्या सहकार्याचा गौरव पूर्ण उल्लेख केला. त्यांनी नॅबच्या नूतन अध्यक्षा  अॅड विद्युल्लता तातेड व सेक्रेटरी शितल सुराणा तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांना त्यांच्या पदाची शपथ दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोक शहा यांनी नॅबच्या कार्याचा गौरव पूर्णउल्लेख करून दोन लाख 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच प्रमुख पाहुणे श्री संदीप सुराणा यांनीही नॅबला आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन  दिले. मुख्य निवडणूक अधिकारी   अॅड. कांतिलाल तातेड व अॅड. प्रकाशचंद्रजी सुराणा यांनी नॅबची नूतन कार्यकारणी जाहीर केली. ती पुढील प्रमाणे.

  अॅड विद्युल्लता तातेड (अध्यक्षा ),श्री अनिल चव्हाण, संगीताबेन शहा, मोहनलाल लोढा, हेमंत देशपांडे व विजय टाटिया यांची उपाध्यक्ष, शितल सुराणा सेक्रेटरी, प्रकाश रामचंद्र विसपुते- खजिनदार, विशाल सेदाणी- सह खजिनदार  तसेच  अॅड .वसंतराव तोरवणे , ऋतुज सुराणा , शोभना शहा  व राजेंद्र डोंगरवार  व  अंबादास घोरपडे सहसचिव  तसेच  नॅबचे  कायदेशीर सल्लागार  म्हणून अॅड. कांतिलाल तातेड  यांची नेमणूक करण्यात आली. 

तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून श्रीमती रेखा सचान, श्रीमती शोभाताई छाजेड, श्रीमती शिल्पा संघवी, अॅड.सिंधुताई पगारे श्रीमती रंजनाताई बलदोटा, सौ. स्वातीताई नागरे, श्री विष्णूभाऊ ढगे ,श्री राजेंद्र कोटकर, श्री शंकर कुटे ,श्री डॉ.विक्रम शहा ,श्री जे पी मुथा  व श्री स्वप्निल सराफ यांची निवड करण्यात आली.

 अनिल चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संगीताबेन शहा यांनी नवकार मंत्र म्हटले. सेक्रेटरी शितल सुराणा यांनी   सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button