महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात मंगळागौरी कार्यक्रम सम्पन्न

पुणे, – महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहातील मुलींसाठी १९ आॅगस्ट२०२२ रोजी श्रावणी शुक्रवार निमित्त शुक्रवारचे महत्त्व, हळदीकुंकू व संस्कार भारती आणि निरामय संस्थेच्या ग्रुपने केलेले मंगळागौरीचे खेळ आयोजित करण्यात आले होते. उत्साहात व आनंददायी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमास संस्कार भारती संस्थेच्या अपर्णा कुकडे व निरामय संस्थेच्या क्षितीजा आगाशे, वसतिगृहाच्या प्रमुख सुमन तांबे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहाच्या कु. कल्याणी भोरकडे व कु. रेश्मा सावंत यांनी केले. प्रास्ताविक वसतिगृहाच्या उपप्रमुख पूनम पोटफोडे यांनी केले. क्षितिजा आगाशे यांनी श्रावणी शुक्रवारची कहाणी सांगितली. सुमन तांबे व मान्यवरांच्या हस्ते आरती झाली

मंगलागौरीच्या खेळामध्ये फुगड्यांचे विविध प्रकार घेतले. त्याचप्रमाणे अनेक पारंपरिक खेळांबरोबरच आधुनिक खेळांचीही सांगड घालून खेळ खेळले. मुलींना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी वसतिगृहातील ९०० मुली व वसतिगृह स्टाफ उपस्थित होता. सर्व मुलींनी कार्यक्रमाचा आनंद लुटला.