पारनेर प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील काकनेवाडी येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. त्या निमित्ताने गावात अखंड हरीनाम सप्ताह चे आयोजन करण्यात आले. कृष्णजन्मा दिवशी काकनेवाडी येथील अविनाश पारख पद मंडळाचा भेदीक भजनाचा कार्यक्रम झाला.तसेच यावेळीदीपोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हभप कोठवळे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
खंडोबा देवस्थान साठी दोन गूंठे जागा बक्षीस पत्र करुन दिल्याबद्दल हभप सखुबाई बबन पवार यांचे,गवरामशेठ वाळुंज यांनी समई (3. फूट ),गुलाबराव वाळुंज सर यांनी हार्मोनियम, जयवंत शेठ वाळुंज यांनी दोन छतरंजी भजनी मंडळास भेट दिल्यामुळे ग्रामस्थानकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.यां दिवशी मोठ्या उत्साहात ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक पार पडली. यात महिला विद्यार्थी,सर्व ग्रामस्थ हिरारीने सहभागी झाले होते.
यावेळी मंदिराना आकर्षक रोषणाई करण्यात आली होती तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती त्यासाठी गावातील युवकांचे योगदान मिळाले.
त्यानंतर
हभप दादाभाऊ महाराज वाळुंज यांची कीर्तन सेवा झाली. धर्म वर संकट आल्यानंतर भगवंतला अवतारीत व्हावे लागते. भक्ताचे रक्षण करण्याकरिता देव येतच असतो असे महाराज म्हणाले.
गोपाळ काल्याच्या दिवशी काल्याची कीर्तन सेवा हभप बाळकृष्ण महाराज कांबळे(श्रीक्षेत्र ताहाराबाद) यांनी केली. तर श्री रामदास देवराम वाळुंज हे काल्याच्या महाप्रसादाचे अन्न दाते होते.
अखंड हरीनाम साप्ताहात योगदान दिलेल्या विद्यार्थी,युवक महिला भजनी मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ्यांचे मनःपूर्वक आभार “हभप रंगनाथ महाराज वाळुंज आणि प्रशांत महाराज वाळुंज यांनी मानले.