इतर

केंद्रीय श्रममंत्री श्री भूपेंद्र यादव यांचे भारतीय मजदूर संघाच्या वतीने मागण्या चे निवेदन

पुणे प्रतिनिधी


कोरोना परिस्थिती नंतर काही ऊद्योग व कामगार क्षेत्रातील परिस्थिती आव्हानात्मक निर्माण झाली आहे. काम व वेतनातील अस्थिरते मुळे कामगार क्षेत्रात भिती चे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या परिस्थितीत मा केंद्रीय श्रममंत्री चे श्री भूपेंद्र यादव यांची स्वावलंबी भारत अभियान my SBA PORTAL ऊद्घाटन कार्यक्रमात भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने पुणे येथे भेट घेऊन निवेदन दिले.
तसेच कामगारांचे खालील महत्वपूर्ण प्रश्न आव्हाने करिता संघटनेचे पदाधिकारी समावेत मिटींग ची मागणी केली आहे.
1) मुंबई औद्योगिक न्यायालयातील न्यायाधीशींची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी. त्यामुळे गतीशिल न्याय प्रक्रिया होईल. व न्याय मिळेल. मुंबई औद्योगिक न्यायालयात दोन न्याय धिशांची पदे रिक्त आहेत. त्यातील ऐक पद 4 वर्षापासून व ऐक पद 2 वर्षापासूनरिक्त आहेत.

2) असंघीटत कामगारांना सामाजिक सुरक्षा योजना तयार करून लागु करण्यात यावी.
2) कंत्राटी कामगारांना रोजगारात सुरक्षा करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी . तसेच कंत्राटी कामगारांच्या वेतनात कामाच्या अनुभवा नुसार वाढ करण्यात यावी व झालेल्या कामाची ग्रजुईटी देण्यात यावी
. 5) भारतीय मजदूर संघाने लेबर कोड नियम, या बाबतीत घेतलेल्या हरकती व सुचनांचा बाबतीत भारतीय मजदूर संघाच्या समावेत त्रिपक्षीय चर्चा आयोजित करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा.
या वेळी भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळात भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, असंघीटत प्रभारी उमेश विस्वाद, पुणे जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, मुंबई अध्यक्ष बापू दडस,प्रदेश सहसचिव राधेश्याम कुलकर्णी, शासकीय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी विवेक ठकार , भामसंघाचे संघटन मंत्री श्रीपाद कुटासकर, हिंदुस्थान अॅन्टोबायटीस्स कंपनीतील संघटनेचे सेक्रेटरी विजय पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button