इतर

राजुर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न


राजुर / प्रतिनिधी

येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव व ग्रामपंचायत निवडणूक या बाबत शांतता समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी. राजुर पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमुख नरेंद्र साबळे .होते.

. यात सर्वोदय विद्या मंदिरचे प्राचार्य. मनोहर लेंडे सर यांनी सांगितले की आज पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गणेश मंडळाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात यावे.उपप्राचार्य बादशहा ताजणे यांनी सांगितले की गणेश मुर्ती एकत्र करून योग्य ठिकाणी विसर्जन करण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. रामशेठ पन्हाळे यांनी निवडणूक येतील जातील परंतु आपण गावच्या विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्र या असे आवाहन केले तर.महावितरणचे अभियंता कुटे यांनी सांगितले की अधिकृत लाईट कनेक्शन गणेश मंडळानी वापरा शक्यतो .लाईट जपून वापरा खूप मोठ्या आवाजाने प्रदुषण होणार नाही शिवाय लहान मुले वृद्ध यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
यावेळी कोहोंडी गावचे पोलीस पाटील यांनी मनोगतात सांगितले की तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसनापासुन दुर रहा.राजुर मशीदिचे मौलाना. यांनी सांगितले राम रहिम एकच आहे. आपण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत.सगळ्यांनी गुण्यागोविंदाने रहा
अध्यक्षस्थानी बोलताना पोलीस निरीक्षक साबळे म्हणाले की.कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस प्रशासन आहे. याच बरोबर सुजाण नागरिकांनी यात सहभागी व्हावे. गणेश मंडळाच्या सभासदांनी.डेकोरेशन पेक्षा गरिब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करावी एक नवा आर्दश समाजासमोर ठेवला पाहिजे. आपल्या वर नजर ठेवण्यासाठी सी.सी.टिव्ही आहे. परंतु आपणही शिस्त संयम पाळावे.
असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक अजय पवार सर यांनी केले तर आभार रवींद्र भांगरे यांनी केले कार्यक्रमास पत्रकार प्रकाश महाले ,एस.टी येलमामे विलास तुपे .आकाश देशमुख. अँड. दत्ता निगळे.दत्ता भोईर अकीलशेठ तांबोळी.अरुण माळवे परिसरातील सर्व पोलीस पाटील सरपंच उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button