पिंपरकने येथे किराणा दुकान फोडले

राजूर पोलिसांनी आरोपींना केले गजाआड!
विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथील किराणा दुकान फोडणार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले पांडुरंग श्रावणा पिचड यांचे पिंपरकणे गावात असलेले किराणा दुकाण अज्ञात आरोपीने फोडुन त्यातील दुकाणातील वस्तु व रोख रक्कम दुकाणातुन चोरुन नेले. त्यानुसार पांडुरंग श्रावणा पिचड याने दिलेल्या फिर्यादी वरुन राजुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.185/2022 भा.द.वि. कलम 380,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त बातमी द्वारे पिंपरकणे गावातील खालील व्यक्तीने चोरी केल्याचे समजले रविंद्र भरत गवारी धर्मानाथ मारुती पिचड, विठ्ठल दुंदा सावळे. अनिल कारभारी पिचड योगेश रामदास पिचड या संशयीत व्यक्तीना ताब्यात घेवुन त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी पाडुरंग श्रावणा पिचड रा. पिंपरकणे, ता. अकोले यांचे गावा शेजारी असलेले किराणा दुकान फोडुन चोरी केले बाबत कबुली दिली. त्याच्या ताब्यातुन मिळालेल्या वस्तुचे वर्णन खालील प्रमाणे11230 /- रू किंमतीच्या दुकाणातील वस्तु, कटलरी माल, गॅस टाकी व गॅस शेगडी, किराणा माल कि.अं.एकुण-11230/- रु. कि.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक, नरेद्र साबळे, पो हे कॉ/ के. डी. नेहे पो कॉ / विजय फटांगरे, पो कॉ / संभाजी सांगळे, पो काँ अशोक काळे, पो कॉ / अशोक गाढे, चा.पो.कॉ / राकेश मुळाणे यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पो हे काँ/559 के. डी. नेहे करीत आहेत.
—//////—–