सोनई–सध्या सुरू असलेले गणेशोत्सव साजरा करतात,मात्र बेल्हेकरवाडी जवळील नवनाथ नगर येथील सरपंच कानिफनाथ येळवंडे व उपसरपंच दत्तात्रय बेल्हेकर यांच्या संकल्पना नुसार गणेश मंडळाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य शिबीर आयोजित करून १८० महिला व पुरुष यांची मोफत नेत्र तपासणी करून सामाजीक उपक्रम राबविण्यात आला. त्यात २३ महिला व पुरुषांना तात्काळ चष्मे देण्यात आले. तर १० महिला पुरुषांना डोळ्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदी उपचारासाठी मोफत सहभाग नोंदविला जाणार आहे. या शिबिरात नवनाथ तरुण मंडळाच्या वतीने परिश्रम घेण्यात आले. प्रारंभी मुळाचे माजी संचालक स्व.मोहनराव येळवंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मुळाचे संचालक आदिनानाथ रौदळ, त्रिंबक आढाव,सुनील बेल्हेकर, महेश येळवंडे, विशाल शेवाळे,नवनाथ येळवंडे, अक्षय तागड,जगदीश सुरसे,आदी उपस्थित होते.