अकोल्यात लंपी आजाराच्या उपचारा साठी मोफत औषधे!

श्री गुरुदत्त मेडिकल अकोले आणि रोटरी क्लब अकोले चा मदतीचा हात
अकोले प्रतिनिधी-
सध्या लंपी या आजाराने जनावरे त्रस्त झालेले आहेत त्यामुळे दूध उत्पादक मोठया संकटात सापडले आहेत.या संकटातुन बाहेर पडण्यासाठी व मुक्या जनावरांचा जीव वाचविण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून जनावरांच्या आजारावर उपचार करण्यासाठी श्री गुरूदत्त मेडिकल चे संचालक अशोकराव सावंत आणि सौ.वर्षाताई सावंत यांनी रुपये 7000 हजार किमतीची औषधे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक धिंदळे साहेब व पंचायत समिती अकोलेचे अधिकारी यांचे कडे मोफत दिले आहेत.
त्याच प्रमाणे सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने ही आज सुमारे 20000/- रुपये किंमतीची लंपी रोग प्रतिबंधक औषधे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक धिंदळे यांच्या कडे सुपूर्त करण्यात आली.याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष मा.डॉ.रवींद्र डावरे,सेक्रेटरी सुनील नवले,माजी अध्यक्ष सचिन शेटे,सचिन देशमुख,सचिन आवारी,खजिनदार रोहिदास जाधव,ऋषि शेवाळे त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेशराव नवले,कृषी अधिकारी सचिन कोष्टी उपस्थित होते. या सामाजिक जाणिवेतून केलेल्या मदतीबद्दल श्री गुरुदत्त मेडिकल चे अशोक सावंत,सौ.वर्षा ताई सावंत आणि रोटरी क्लब अकोले चे पदाधिकारी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
