इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि 20/09/2022

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २९ शके १९४४
दिनांक :- २०/०९/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२६,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २१:२७,
नक्षत्र :- पुनर्वसु समाप्ति २१:०७,
योग :- वरीयान समाप्ति ०८:२४,
करण :- वणिज समाप्ति ०८:१६,
चंद्र राशि :- मिथुन,(१४:२४नं. कर्क),
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०८प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:२४ ते ०४:५५ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५२ ते १२:२३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२३ ते ०१:५३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:२४ ते ०४:५५ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
दशमी श्राद्ध, घबाड २१:०७ प., भद्रा ०८:१६ नं. २१:२७ प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २९ शके १९४४
दिनांक = २०/०९/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
संगत योग्य आहे काय ह्याचा विचार करा. प्रवास संभवतात. वरिष्ठ अधिकार्‍याची गाठ पडेल. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. खर्चात वाढ होऊ शकते.

वृषभ
जुने वाद संपुष्टात येतील. अंगीभूत कुशलता योग्य जागी वापरा. भौतिक सुखाच्या साधनात वाढ होईल. आपलेच मत समोरच्या व्यक्तिला पट‍वून द्या. दिवस आनंदात घालवाल.

मिथुन
व्यायामाला नव्याने सुरवात करा. उत्तम भाषाशैली वापराल. व्यवसायात एखादा प्रयोग कराल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बचतीच्या योजना आखाल.

कर्क
अति हळवे होऊ नका. भौतिक सुखात वृद्धी होईल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.

सिंह
तुमची लोकप्रियता वाढेल. जुने छंद जोपासावेत. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांशी योग्य ताळमेळ राहील. आत्मविश्वास वाढीस लागेल.

कन्या
श्रमाला घाबरून चालणार नाही. उगाचच कच खाऊ नका. व्यसनांपासून दूर रहा. विरोधक नरमाईने घेतील. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

तूळ
अनाठायी बडबड टाळावी. झोपेची तक्रार जाणवेल. आपले वागणे लोकांना चमत्कारिक वाटेल असे वागू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.

वृश्चिक
आरोग्यासाठी हितकारक अशा गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येक कामात उगाचच ढवळाढवळ करू नका. ज्येष्ठ व्यक्तींची गाठ पडेल. एका भेटीमुळे अनेक कामे मार्गी लागतील. रूचकर पदार्थांचा आस्वाद घ्याल.

धनू
आपला लोकसंग्रह वाढीस लागेल. जवळचा प्रवास सुखकारक होईल. अविवेकाने वागू नका. क्रोध वृत्तीत वाढ होईल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल.

मकर
नवीन जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवा. इतरांना आनंदाने मदत कराल. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध ठेवा. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.

कुंभ
खोल विचार करण्याची तयारी ठेवा. प्रलंबित कामे मार्गी लागतील. दिवस मनाप्रमाणे घालवाल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. कौटुंबिक सदस्यांचे सहकार्य लाभेल.

मीन
जोडीदाराची प्रगती दिसून येईल. कौतुकासाठी काही काळ वाट पहावी लागेल. धार्मिक कामात रस घ्याल. मौसमी आजारापासून काळजी घ्या. पथ्यपाणी चुकवू नका.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button