सातेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर बिरसा ब्रिगेड चा झेंडा

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत सातेवाडीत आदिवासी विचारधारा प्रेणित बिरसा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या सरपंचासह ११ पैकी आठ सदस्यांनी बाजी मारली
. बिरसा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रथमच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत ११ पैकी आठ ठिकाणी विजय मिळवत बिरसा ब्रिगेडने महाराष्ट्रात प्रथमच एक ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. प्रभाग क्र. १ मधील विजयी उमेदवार भरत एकनाथ दाभाडे व .रोहिणी पांडूरंग गभाले यांची बिनविरोध निवड झाली.

तसेच प्र.क्र.२ मधील .वंदना किसन मुठे या बिनविरोध तर आदि.लक्ष्मण किसन मुठे हे निवडून आले. प्र.क्र.३ मधून आदि.संगिता सुरेश दिघे तर प्र.क्र. ४ मधून . किसन चहादू दिघे, .लक्ष्मण विठ्ठल दिघे व .बेबी भास्कर दिघे हे उमेदवार विजयी झाले. पहिल्यांदाच झालेल्या थेट जनतेतून सरपंच निवडणूकीत बिरसा ब्रिगेडचे प्रमुख मार्गदर्शक, सेवानिवृत्त अधिकारी, केशव गोविंद बुळे यांचा बहूमतांनी विजय झाला.
बिरसा ब्रिगेड ही एक सामाजिक संघटना असून ती आरोग्य, शिक्षण, मुलभुत अधिकार व आदिवासी संस्कृती संवर्धनाचे काम संपूर्ण सह्याद्रीत करीत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात आजवरच्या बिरसा ब्रिगेडचे कार्य पाहून महिला, तरुणवर्ग तसेच ज्येष्ठ नागरीकांनीही कौल देत सदस्यांना निवडून दिले. विजयी उमेदवारांवर समाजातील सर्वच स्तरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.