इतर

निळवंडे धरणाच्या कालव्यांतुन पाणी देण्याचा शुभारंभ होणार नरेंद्र मोदींच्या हस्ते !

अकोले प्रतिनिधी
निळवंडे धरणाच्या कालव्यांतुन पाणी देण्याचा शुभारंभ जानेवारीत मोदींच्या हस्ते करण्यात येईल असे महसूल मंत्री राधाकृष्ण  विखे पाटील यांनी सांगितले ते अकोले तालुका दौऱ्यावर आले  यावेळी बोलत होते 

छायाचित्र नंदकुमार मंडलिक

मंत्री विखे पाटील यांनी निळवंडे धरणप्रकल्पावर जावून अधिकाऱ्यां समवेतबैठक घेवून कामाच्या सद्यस्थितीचाआढावा घेतला. व धरणाचे पाण्याचे जलपूजन केले पिंपरकणे येथील मोठ्यापुलाची तसेच उच्चस्तरीय कालव्यांच्या कामाची पाहाणी त्यांनी केली. 
अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेलात्याग आणि जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनीनिळवंडे धरणाचे साठी घेतलेल्या पुढाकारामुळेच निळवंडेधरणांचा ऐतिहासिक प्रकल्प पूर्णत्वास जातआहे. काही लोक निळवंडे धरणाचे श्रेय स्वतःच्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्नकरतात अशी टीका  त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वर केली 

अकोले तालुक्याच्या सर्वागीण विकासाचाआराखडा तयार करण्याच्या सूचना आपणजिल्हाधिकार्यांना दिल्या असून पर्यटनाच्यामाध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माणकरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचेसर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिले , देवेंद्रफडणवीस मुख्यमंत्री असताना पिचडसाहेबांनी पुढाकार घेवून मुंबईत झालेल्याबैठकीत सर्व निर्णय झाल्यामुळेच कालव्याचे काम सुरू झाले. याकडे त्यांनी लक्ष वेधले धरणाचे सर्व श्रेय मधुकरराव पिचड यांचे असून धरणासाठी त्याग केलेल्या शेतकऱ्यांचे असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

मागील अडीच वर्षात आघाडी सरकार असलेल्या तीन पक्षाच्या सरकारने कोणताही प्रकल्प राज्याला दिला नाही. जिल्हयाला तीनमंत्री होते परंतू कोव्हीड संकटात तालुक्यात एकही फिरकला नाही. माझे कुटूंब तुमचीजबाबदारी एवढेच म्हणून सरकार घरात बसले होते. महाराष्ट्राच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा विश्वनेता उभा राहील्यामुळेच राज्याला मोफत लस आणि धान्य मिळाले यामुळे उपासमार टळली. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशाचा अर्थिक विकास दर वाढतअसल्याने हे राज्य आणि देश खंबीरपणेवाटचाल करीत असल्याकडे त्यांनी सांगितले.राज्यात शिंदें फडणवीस सरकार सत्तेवरआल्यानंतर जनतेला आपल्या मनातील सरकार आल्या सारखे वाटत आहेत. जनतेच्या हिताचेच निर्णय सरकार घेईल असे आश्वासन देवून विखे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे नूकसानझालेल्या शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली. नियमित कर्जभरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्याअनुदानाची अंमलबजावणी या सरकारने केलीअसल्याची माहीती त्यांनी दिली.
लंपी आजारामुळे इतर राज्यात मोठ्या प्रमाणात जनावर दगावत आहेत मात्र राज्य सरकारने सर्व जनावरांचे मोफत लसीकरणकरून दगावलेल्या जनावारांना मदतदेण्याचाही निर्णय घेतला आहे. अकोलेतालुक्यातील ४६ हजार जनावारांचे लसीकरणपूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव पिचड,  वैभवराव पिचड ,शेतकरी नेते दशरथ सावंत, शिवाजीराव धुमाळ यांची या प्रसंगी भाषणे झाली.यावेळी। जालिंदर वाकचौरे सीताराम भांगरे,नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी ,बी जे देशमुख सीताराम देशमुख,वसंतराव देशमुख यशवंत आभाळे मुकुंद सदाफळ विश्वास राव कडू रामभाऊ भुसा ळ सुनील दातीर आदी मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button