सोलापूरात चला… सखींनो….!’बतकम्मा’ नृत्य शिकूया….!!

.
नवरात्र उत्सव निमित्ताने पद्मशाली सखी संघमचा उपक्रम
सोलापूर-प्रतिनिधी
नवरात्रोत्सव सबंध देशात साजरा केला जातो, प्रत्येक राज्यात विशिष्ट पद्धतीने आणि पारंपरिकपणे खेळ मांडला जातो. परंतु सोलापूर शहराच्या पूर्व भागात तेलंगणा राज्यातील तेलुगू समाज महिला आजही नवरात्रोत्सवात अष्टमीला पारंपरिक पद्धतीने बतकम्मा उत्सव लोकनृत्याने साजरा करण्याची परंपरा आहे.बतकम्मा भोवती फेर धरुन लोकनृत्य करणा-या ज्येष्ठ महिला वयानुसार खेळ सादरीकरण करत नसल्याने नव्या पिढीला ज्ञात नसल्याने अडचणी ठरु शकत आहे, म्हणून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित, पद्मशाली सखी संघमच्या वतीने नव्या पिढीला ज्ञात होण्यासाठी बतकम्मा भोवती फेर धरुन लोकनृत्य शिकवण्यात येणार आहे, अशी माहिती पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा सौ. माधवी अंदे यांनी माहिती दिल्या आहेत.
आडवाल्लू मिकू जोहारलू..! (महिलांनो तुमच्या कर्तृत्वाला सलाम) या उपक्रमांतर्गत पद्मशाली सखी संघमच्या वतीने यंदाच्या नवरात्रोत्सवात विविध अनोखा उपक्रम राबविले जाणार आहे. त्याच अनुषंगाने अष्टमीला ‘जल्लोष सखींचा.. बतकम्मा सोहळ्याचा, चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनी रचीत ‘दुर्गा सप्तशती’चे बीज मंत्राचे पठण आणि यशस्वी ‘स्त्री’चे विविध रुपे उलगडणार.! बतकम्मा महोत्सवात लकी ड्रॉ पद्धतीने तीन विजेत्या महिलांना चाटला पैठणी सेंटर तर्फे सेमी पैठणी साडी पारितोषिके दिले जाणार आहे. हा उपक्रम सामाजिक मंडळांशी संलग्नित करण्यात येणार आहे.
बतकम्मा महोत्सव साजरा करताना फेर धरण्यासाठी तेलंगणा प्रांताची लोकनृत्य दि. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी असे सलग दोन दिवस सायंकाळी पाच वाजता सुरु होणार आहे. लोकनृत्य विनामूल्य असून पूर्व भागातील श्रीराम मंदिर येथे सौ.रेखा रुद्रोज या शिकवणार आहेत. ज्या महिला सहभागी होणार आहेत अशा महिलांनी (८७८८९७०८१४) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा माधवी अंदे, उपाध्यक्षा संध्याराणी अन्नम, सचिव सौ राधिका आडम,सहसचिवा जमुना इंदापूरे, कार्याध्यक्षा वैशाली व्यंकटगिरी, सहकार्याध्यक्षा लक्ष्मी चिट्याल, खजिनदार प्रभावती मद्दा,सहखजिनदार ममता मुदगुंडी यांनी केल्या आहेत.