अहमदनगर रेल्वे माल धकक्यातील नोंदणी कृत माथाडी कामगारांकडून होणारे शोषण थांबवा- अविनाश पवार
.
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
-अहमदनगर रेल्वे माल धक्यातील माथाडी कामगारांनाकडुन तक्रार प्राप्त झाल्यावर माथाडी कामगार सेना अध्यक्ष मा.अरविंद गावडे , तसेच सरचिटणीस अनिल चितळे , महेंद्र जाधव डी.एन. साबळे ,जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार ,सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के यांनी प्रत्यक्ष माल धक्क्यावर भेट दिली असता अनेक धक्कादायक व गंभीर गोष्टी निदर्शनास आल्या आहेत कामगारांचे खर्या अर्थाने शोषन चालु असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले आहे अहमदनगर रेल्वे स्टेशन माल धक्का विळद घाट येथे स्थलांतरित करण्यास कामगारांचा विरोध असताना सुद्धा प्रयत्न केला गेला कमी पगारात कामं करण्यासाठी ठेकेदाराकडुन दबाव होत असल्याचे कामगारांनी सांगितले धक्का हालऊन कामगारांना बेरोजगार करण्याचा प्रयत्न ठेका घेतलेली कंपनी करत असल्याचे समजले हुंडेकरी सोबत अॅग्रीमेंट मार्च २०२१मध्ये झाले असुन फरक बिल,वारइ बिल,व पगार फरक बिल अजुन पर्यंत थकीत आहे
परप्रांतीय कामगारांना अनाधिकृत पणे माल धक्कात प्रवेश देऊन कमी रोजाने कामं करुन घेतली जातात 1प्रत्येक महिन्याचा पगार १५ते २०दिवस लेट होतो पिण्याचे पाणी सुविधा नाही, किंवा हात पाय धुण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही. स्वच्छता गृहाची कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही.सरकारी कुठल्याही प्रकारची सुविधा योजनेचा अात्तापर्यंत लाभ देण्यात आला नाही. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अथवा आरोग्याच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही कामगारांना येण्याची व जाण्याची सुविधा उपलब्ध नाही वारइचे पैसे सुद्धा वेळेवर भेटत नाही आहे जेवण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही ८.३३% बोनस मधून ४हजार रुपये कटिंग श्रमीक हाॅस्पीटल मध्ये गोळ्या सोडून दुसरी औषध उपलब्ध नाही किंवा खाजगी हाॅस्पीटल मध्ये कामगारांनी जाण्यासाठी स्वतः डाॅक्टर सांगतात माल धक्यामध्ये काम करत असताना अॅक्सीडेंट होऊन अपंगत्व प्राप्त झाले असताना सुद्धा त्या कामगारांकडुन काम करुन घेतली जातात. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करुन १५ दिवसात योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या वतीने कामगार सह आयुक्त श्री. नितीन कवले साहेब यांची प्रत्येक्ष भेट घेऊन करण्यात आली आयुक्त यांनी सुध्दा दखल घेऊन मदत करण्याच आश्वासन दिले आहे जर १५ दिवसात अपेक्षित बदल होऊन कामगारांना न्याय मिळाला नाही तर कामगारांच्या न्याय हक्कासाठी तीव्र स्वरूपाचे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल व यास जबाबदार आयुक्त राहतील असे माथाडी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.