मान्हेरे केंद्रात शालेय साहित्य वाटप, मुंबई येथील आमास सेवा ग्रुपचा अभिनव उपक्रम

अकोले—प्रतिनिधी
गोरगरिब विद्यार्थीयांना शिक्षणात येणार्या अडचणी दूर करण्यासाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अमास सेवा ग्रुप मुंबई च्या माध्यमातून कार्यरत असलेल्या पुष्य सेवा ग्रुप विलेपार्ले (मुबई) यांच्या वतीने मान्हेरे केंद्रातील १२ शाळांतील जवळपास ५८० विध्यार्थ्यांना स्कूल बॅग,वह्या,पेन,पेन्सिल,रबर,शार्पणर, पट्टी,चित्रकला वही,रंगीत खडू यासह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,टिटवी (ता.अकोले ) या ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खिरविरे बिट चे शिक्षण विस्तार अधिकारी मा .संभाजी झावरे साहेब होते तर .पुष्य सेवा ग्रुपच्या अध्यक्षा पुष्पा बेन अग्रवाल, छाया बेन पारेख मिराबेन, पन्नाबेन तसेच अमास सेवा ग्रुपचे अध्यक्ष चंद्रकांत देढिया,केंद्र प्रमुख नवाळी साहेब, भांगरे साहेब, सिताराम धांडे , जेष्ठ शिक्षक भागवत लेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्हेरे केंद्रातील बारा शाळेतील विद्यार्थीयांनी विवीध कार्यक्रम सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी टिटवीचे नवनिर्वाचित सरपंच तुकाराम वायळ,सर्व ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील प्रकाश मुंढे,शालेत व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष मारुती मुंढे,पुष्पा वायळ, महिला बचत गट सदस्य, तरुण मंडळ सदस्य,बारा गावातील पालक वर्ग, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद पांजरे केंद्रातील सुकटे , बाळू दराने , लांघी एकनाथ ,अमोल सुकटे , भरत बांबेरे , मच्छिंद्र येडे , टिटवी येथील शाळेचे देशमुख, युवराज तळपे,चौधरी, सर्जून बांबेरे, वायळ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनमोल सहकार्य केले.सूत्रसंचालन बांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामनाथ मुंढे यांनी केले.