सोनई सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.

कर्जदार शेतकरीच सभासद ठेवणार जेष्ट मार्गदर्शक विश्वासराव गडाख
सोनई–नेवासा तालुक्यातील सोनई विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष रामराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेचे मार्गदर्शक माजी अध्यक्ष विश्वास राव गडाख प्रस्तावित भाषणात म्हणाले,सेवा सोसायटीचे जे शेतकरी कर्ज घेऊन परतफेड करत असतात तेच कर्जदार शेतकरी यांचे सभासदत्व कायम राहतील.असे प्रतिपादन गडाख यांनी केले.
शासकीय व बँकिंग धोरणानुसार क्रियाशील व क्रियाशील याची माहिती घेऊन संस्थेच्या माध्यमातून राजकारण न करता सभासदांच्या हितासाठी निर्णय घेतला जाणार आहे.
या पुढेही संस्था जेष्ट नेते यशवंतराव गडाख,माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विचारांने कशी जास्त नफ्यात येऊन सातत्याने सभासदांना चागला लाभांश कसा वाटता येऊ शकेल,यासाठी वसुली महत्वाची असल्याचे विद्यमान अध्यक्ष रामराव गडाख यांनी सूचना केली.
संस्थेचे सचिव वसंत बारगळ व लेखापाल संतोष गडाख यांनी अहवाल वाचन केले.
यावेळी संस्थेसाठी हिताचे निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आले.
साधक बाधक चर्चेत उपाध्यक्ष आप्पासाहेब निमसे,संचालक भास्कर भुसारी,माजी उपाध्यक्ष पांडुरंग अनारसे,सभासद जालिंदर येळवंडे, व दत्तात्रय बनकर,आदीनी चर्चेत भाग घेतला.
यावेळी संचालक मुळाचे संचालक बाळासाहेब बनकर, बेल्हेकरवाडीचे उपसरपंच दत्तात्रय बेल्हेकर,रावसाहेब गडाख,डॉ. गजानन दरंदले,दादासाहेब दरंदले,भाऊसाहेब येळवंडे,संजय घावटे, नामदेव येळवंडे,यांच्यासह संचालक , सभासद आदी कर्मचारी उपस्थित होते.
आभार अजय लोंढे यांनी मानले.
