केंद्रीय मंत्री आदिवासींच्या ठाकरवाडीत जातात तेव्हा….
अकोले, ता.३०: मी तुमच्यातील एक आहे.तुमचे प्रश्न समजून घेण्यासाठी मी आलो आहे.असे केंद्रीय मंत्री पटेल यांनी आदिवासी गाव असलेल्या देवठाण गावच्या गिरहे वाडी येथील ठाकर वस्तीत रखमा भागूजी गिऱ्हे यांच्या घरात जाऊन सवांद साधला.
लोकसभा प्रवास योजनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पटेल यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघाचा दौरा केला.आज सकाळी ते अकोले तालुक्यात आले होते.महिला व तरुणींनी ढोल ताशा गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले.आदिवासी चीमा गिऱ्हे, आनंदा गिऱ्हे,अरुण शेळके,सोमनाथ मेंगाळ यांनी फडकी व रान फुले देऊन मंत्री महोदय यांचे स्वागत केले. तर घरातील बाजरीची भाकरी व ठेचा आणून त्यांच्यासमोर ठेवला मात्र त्यांना नवरात्र उपवास असल्याने मग डाळिंब ,पपई फळ देऊन त्यांचे आदरतिथ्य केले.यावेळी त्यांच्यासमवेत माजी मंत्री मधुकर पिचड,आमदार राहुल आहेर,माजी आमदार वैभव पिचड जालिंदर वाकचौरे,सीताराम भांगरे,राजेंद्र गोंदकर उपस्थित होते.यावेळी सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.प्रसंगी वीज,पाणी, रस्ते याबाबत माहिती घेतली यावेळी हिराबाई पथवे,भोराबई गिऱ्हे,सोमाबई गिऱ्हे,लीलाबाई गिऱ्हे,सुंदराबाईगिऱ्हे,महादूगिऱ्हे,मोहनगिऱ्हे,नावजीगिऱ्हे,अण्णा पथवे,भीमा गिऱ्हे या ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी केवळ चार महिने मिळते,वीज कधी आहे कधी नाही,रस्ता फुटला आहे खाते वाटप नाही,घरकुल योजना आदी अडचणी मांडल्या प्रसंगी उपस्थित अधिकारी याना तातडीने कार्यवाही करावी याबाबत माजी आमदार वैभव पिचड यांना माझ्याशी संपर्क करा निधी उपलब्ध करून दिला जाईल .तसेच आदिवासी भागात कार्यकर्त्यांनी सतर्क राहून योजनांचा लाभ मिळवून देण्याचे सूचना केल्या तर अधिकारी व भाजप यांच्याशी चर्चा केली. व आपल्या अंगावर टाकलेली फडकी वृध्द महिला सोनाबाई यांच्या अंगावर टाकत दर्शन घेऊन ते पुढे गेले.त्यामुळे आदिवासी वाडीत केंद्रीय मंत्री आल्याची चर्चा जोरदार रंगली..