इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि ०१/१०/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन ०९ शके १९४४
दिनांक :- ०१/१०/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:१७,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- आश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति २०:४७,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति २७:११,
योग :- आयुष्मान समाप्ति १९:५८,
करण :- कौलव समाप्ति ०९:४३,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,

राहूकाळ:- सकाळी ०९:२० ते १०:४९ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:४८ ते ०३:१८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:१८ ते ०४:४७ पर्यंत,

दिन विशेष:-
घबाड २०:४७ प., शुक्र पूर्व लोप,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन ०९ शके १९४४
दिनांक = ०१/१०/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक बाबतीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कोणतेही काम जोडीदाराच्या भरवशावर सोडू नका. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. कौटुंबिक समस्यांवर सहज उपाय सापडतील. मनातील एखादी गोष्ट पूर्ण होण्याआधी कुणालाही सांगू नका. अन्यथा लोक त्याचा फायदा घेतील.

वृषभ
आजचा दिवस शुभ राहील. तुम्हाला काही चांगली माहिती मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. आज तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत प्रगती होईल. तुमचे काम आणि वागणूक तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांना आनंद देईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो.

मिथुन
नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो. मालमत्तेतून उत्पन्न वाढेल. आईकडून धनलाभ होऊ शकतो. कला आणि संगीतात रुची वाढेल. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकते. आपण भूतकाळातील घटना बदलू शकत नाही, परंतु आपण त्यांच्याकडून धडा घेऊ शकतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. असेच पुढे चालत राहायचे आहे.

कर्क
आरोग्य चांगले राहील. कामाला वेळ द्या. आळसापासून दूर राहा. प्रेम जीवनात आनंदी राहील. राजकारणाशी संबंधित लोक अधिक सक्रिय होतील. अध्यात्मिक कार्यामुळे मन शांत होईल. सामाजिक स्तरावर तुमची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल. आयुष्यात वारंवार येणारे अपयश आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे चुकीचे वागणे तुमच्यात कटुता निर्माण करू शकते.

सिंह
आज तुम्ही शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ आणि मानसिकदृष्ट्या चिंतेत राहाल. घरातील सदस्यांसोबत गैरसमज होऊ शकतात. आईसोबत कोणत्याही गोष्टीवरून वाद होऊ शकतो. घरातील महिलांच्या आरोग्याची चिंता राहील. सरकारी आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजनेनुसार काम करावे लागेल.

कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्ततेचा असेल. कपडे आणि दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात चांगली कमाई होईल. जर, तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. नोकरीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी गंभीर आणि जबाबदारीने वागावे लागेल. एखादे रखडलेले कामही आज सुरू होऊ शकते.

तूळ
मित्राच्या मदतीने तुम्ही उत्पन्नाचे नवीन साधन शोधू शकता. मनात शांती आणि आनंदाची भावना राहील. संभाषणात संयम ठेवा, रागाचा अतिरेक टाळा. शैक्षणिक कार्याचे सुखद परिणाम दिसतील. इतर ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो. नोकरीत अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल, बदली होऊ शकते. आर्थिक गोष्टींचे नियोजन सुरु करा. अन्यथा पैशांची चणचण भासेल.

वृश्चिक
सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही अतिरिक्त जबाबदाऱ्या पडू शकतात, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. कामाच्या ओझ्यामुळे तुम्ही तणावाखाली येऊ शकता. नोकरदार लोक आपल्या सहकाऱ्यांकडून गोड बोलून आपली कामे सहज करून घेतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

धनु
आज अपघाताची भीती राहील. प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगा. अचानक एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च होऊ शकतो. स्वभावात थोडा चिडचिडेपणा राहील. शारीरिक व मानसिक आनंद मिळेल. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरदार लोकांना कोणत्याही कामात अडचण येणार नाही. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे.

मकर
आपल्या चुकीच्या वागणुकीचा त्यांच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळा. काम करताना काळजी घ्या. कोणतेही चुकीचे काम करण्याचा विचार मनात आणू नका. आरोग्य सुधारेल. आनंदी जीवनासाठी आर्थिक प्रगतीसोबतच मानसिक शांतीही आवश्यक आहेत. मानसिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा.

कुंभ
आज तुम्हाला संपत्तीशी संबंधित कोणत्याही कामात घाई करणे टाळावे लागेल, अन्यथा तुमचा हा व्यवहार तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. हातचं सोडून लोकांना मदत केल्यास, लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. पैशासंबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्यावा लागेल. अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणतीही निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

मीन
आज तुमच्यात काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा असेल. चांगले पैसेही कमवू शकता. तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळू शकते. आज जुन्या गोष्टींवर चर्चा करणे टाळा, अन्यथा तणाव निर्माण होईल. कौटुंबिक जीवनात परस्पर सहकार्यामुळे प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांशी संपर्क साधता येईल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button