इतर

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे नागपूर येथे अधिवेशन

पुणे/ प्रतिनिधी

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे ५ वे त्रैवार्षिक अधिवेशन दि ८ व ९ ऑक्टोबर 2022 रोजी रेशीम बाग नागपूर नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघ ही संघटना महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज कंपनीतील नियमित रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी कामगारांचे नेतृत्व करणारी अग्रगण्य संघटना असून राज्यभरात संघटनेचे 12,000 पेक्षा जास्त सदस्य आहेत.

वीज सेवा देताना शेकडो कामगार जायबंदी व शहीद झाले त्यांच्या वारसाला आर्थिक मदत व नोकरी मिळावी, कामगाराला ग्रॅच्युइटी तसेच अपघात विमा आणि कुटुंबियांना मेडीक्लेम मिळावा, कंत्राटदार विरहित व वयाच्या 60 वर्षा पर्यंत जॉब सिक्युरिटी मिळावी या साठी रानडे समितीचा अहवालाची अंमलबजावणी करावी, अथवा या कामगारांच्या साठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून न्याय द्यावा, वीज हा धोकादायक उद्योग असल्याने स्वतंत्र वेतन श्रेणी लागू करावी, ई ऐस आय योजना, लाभां मध्ये वाढआदी महत्वपूर्ण ठरावा बाबतीत चर्चा होणार आहे. कामगारांच्या समोरील आव्हानात्मक परिस्थिती, उपाय योजना बाबतीत मार्गदर्शन होणार आहे. अधिवेशन व्यवस्था व तयारी बाबतीत पुणे येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या अधिवेशनाचे उद्घाटक भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री मा.रविंद्र हिंमते, प्रमुख उपस्थिती मा.सी.वी. राजेश क्षेत्रीय संघटन मंत्री भा.म.संघ, स्वागताध्यक्ष मा.दत्ता धामणकर, मा.गजानन गटलेवार विदर्भ प्रदेश महामंत्री, मा.अनिल ढुमणे, प्रदेश अध्यक्ष, मा. के.के.हरदास, मा.अण्णा देसाई ज्येष्ठ मार्गदर्शक, मा. सुभाष सावजी पालक मंत्री, मा.विठ्ठल भालेराव अध्यक्ष वीज कामगार महासंघ, मा.अरूण पिवळ, महामंत्री वीज कामगार महासंघ, आणि दिनेश वशिष्ठ अध्यक्ष अखिल भारतीय संविदा मजदूर संघ व अन्य अनेक मान्यवर व राज्यभरातून निवडक 1200 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या वेळी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे , कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटन मंत्री राहूल बोडके, कोषाध्यक्ष सागर पवार , सुमीत कांबळे, निखील टेकवडे, निलेश गदगे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button