इतर
कोतुळ येथे उद्या संवर्धन दूध
कोतुळ येथे उद्या संवर्धन दूध
शीतकरण प्रकल्पाचा शुभारंभ

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे संवर्धन दूध शीतकरण प्रकल्पाचा शुभारंभ विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर होत आहे बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता शेतकऱ्यांच्या हस्ते हा शुभारंभ होत आहे
अकोले तालुक्यातील मुळा परिसरातील शेतकऱ्यांची गरज ओळखून शेतकऱ्यांना दूध उत्पादन वाढीसाठी व दुधाला योग्य भाव देण्यासाठी संवर्धन शेतकरी ऍग्रो प्रोडूसर कंपनीची स्थापना करून या कंपनीमार्फत शेतकऱ्यांचे संवर्धन दुधशीतकरण प्रकल्पाचा शुभारंभ विजयादशमी च्या दिवशी होणार आहे