अगस्ती च्या चेअरमन पदी सीताराम पाटील गायकर तर व्हाईस चेअरमनपदी अशोकराव भांगरे!

अकोले | प्रतिनिधी
अगस्ती कारखान्याच्या चेअरमनपदी जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक समृद्धी मंडळाचे नेते सिताराम पाटील गायकर यांची तर उपाध्यक्षपदी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पारंपरिक राजकीय विरोधक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांची आज बिनविरोध निवड झाली.
अगस्ती कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली महाविकास आघाडीचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार. डॉ किरण लहामटे व सहकारातील ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर अशोकराव भांगरे, डॉ अजित नवले, मधुकर नवले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळाने सर्वच्या सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळविला होता भाजपा चे जेष्ठ नेते मधुकरराव पिचड माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळा चा दारुण पराभव केला
निवडणुकींनंतर समृद्धी मंडळाचे ज्येष्ठ नेते सिताराम पाटील गायकर यांचे नाव पहिल्या पासून चेअरमन पदा साठीं निश्चित मानले जात होते.तर उपाध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक होते मात्र माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत अशोकरराव भांगरे यांचे नावावर एकमत झाले होते यामुळे आजच्या संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत ही बिनविरोध निवड पार पडली .
सीताराम गायकर आणि अशोकरराव भांगरे यांच्या निवडी नंतर अकोल्यात फटाके फोडुन जोरदार स्वागत करण्यात आले
पवारांच्या विचारांची सत्ता दिल्याने आमदार लहामटेंनी मानले सर्वांचे आभार
व्हाईस चेअरमन पदावर अशोकराव भांगरे यांची निवड झाल्याने त्यांच्या रूपाने आदिवासी समाजाला न्याय दिला आहे ही सगळ्यात आनंदाची बाब आहे गायकर साहेबानी खऱ्या अर्थाने अगस्तीचा कारभार केला तालुक्यातील सहकार क्षेत्राचे अनुभवी नेते अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन झाले याचा अभिमान आहे अकोल्यातील मायबाप जनता याचा आनंद साजरा करत आहे अगस्तीचा उद्या बॉयलर प्रदीपन होत आहे माझ्यासाठी ही खूप खूप महत्त्वाची बाब आहे असे आमदार डॉ किरण लहामटे यांनी सांगितले शरद पवार साहेबांचा कारखाना उभारणीत मोठा वाटा आहे त्यांच्या व मित्र पक्षाची सत्ता कारखान्यात दिल्याने लहामटें यांनी तालुक्यातील जनतेचं आभार मानलं
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही –
सीताराम पाटील गायकर
पक्षाचे प्रमुख नेते मंडळींनी आणि कारखान्याचे सर्व सभासदानी आम्हाला एवढे मोठे मतांच्या फरकाने निवडून दिले आहे यामुळे आमच्यावर मताच्या रूपाने मोठी जबाबदारी टाकली आहे।
हा कारखाना समर्थपणे ही सगळी मंडळी चालवतील आणि ती बंद पडू देणार नाही ही भावना खरं म्हणजे आमच्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची होती आणि म्हणून प्रचंड असा विश्वास मतदारांनी शेतकरी समृद्धी मंडळावर टाकला आमदार लहामटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ,काँग्रेस ,माकप भाकप शिवसेना शेतकरी संघटना आरपीआय असे सर्वच पक्षाचे नेते मंडळीवर विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे नूतन चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी निवडी नंतर बोलताना सांगितले