स्त्री क्षमतांचा जागर नवरात्रोत्सवात व्हावा – कविताताई आव्हाड

पाथर्डी प्रतिनिधी
स्री म्हणजेच समर्पण, त्याग, सहनशीलता आणि प्रेम यांचा अनोखा संगम. या सगळ्या स्त्रीक्षमतांचा जागर नवरात्रोत्सवात व्हावा यासाठीच गेली नऊ दिवस
सन्मान नवदुर्गांचा उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान व
त्यांचा विद्यार्थीनीबरोबर संवाद झाल्याने त्यामधून विद्यार्थीनीना प्रेरणा मिळण्याचे समाधान मिळाले
असे प्रतिपादन मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविताताई आव्हाड यांनी केले.
आव्हाड बाबुजी महाविद्यालयात आयोजित सन्मान नवदुर्गांचा या समारोप कार्यक्रमाच्या वेळी त्या
बोलत होत्या.
व्यासपीठावर मनीषा मेहेरकर, विद्याताई भंडारी, डॉ. वैशाली आहेर, सुनिता तारापुरे, लीना राठी
आदी उपस्थित होत्या.
कविताताई आव्हाड म्हणाल्या की, आपले काम प्रामाणिकपणे व सातत्याने करत रहा. कितीहीसंकटे आली तरी डगमगून न जाता या संकटाना संधी मानून यशासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा. यशाला कोणताही शॉर्टकट नसून यश म्हणजे कठोर परिश्रम, संयम व सातत्य यांचा परिपाक आहे. तुमच्या मनात जर कोणतीही
गोष्ट मिळविण्याची जिद्द असेल तर ती गोष्ट तुम्हाला मिळणारच. त्यासाठी जीवनाकडे सकारात्मक
दृष्टीने पाहण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.
सन्मान नवदुर्गांचा हा काळात कार्यक्रम नवरात्रोत्सव गेली नऊ दिवस येथील अभय
आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान व मैत्रेयी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी
आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत पाथर्डी शहरातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा
ठसा उमठविणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये उद्योजिका उमा बजाज, सीमा
फासे, सिस्टर शीला जाधव, आदर्श शिक्षिका अनुराधा फुंदे, बचतगट प्रणेत्या भारतीताई असलकर, जयाताई भावसार व माजी उपनगराध्यक्षा मनीषाताई उदमले, मनीषा मेहेरकर व विद्याताई भंडारी यांनी विद्यार्थिनीनी विविध प्रकारे मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थीनींनी सांस्कृतीक कला सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेखा चेमटे, सुत्रसंचालन प्रा. प्रणिता भावसार तर आभार प्रा. आशा पालवे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी अनुजा कुलकर्णी, सारिका लाडे, रेश्मा सातपुते, कीर्ती दगडखैर, जयश्री एकशिंगे आदींनी परिश्रम घेतले.