कोरठण खंडोबा देवस्थान अध्यक्षपदी शालिनी घुले, उपाध्यक्षपदी महेश शिरोळे

सर्वांना बरोबर घेऊन काम करणार : शालिनी घुले
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थानच्या अध्यक्षपदी शालिनी अशोक घुले, तर उपाध्यक्षपदी महेश भास्कर शिरोळे यांची बिनविरोध निवड झाली.
कोरठणला आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली. देवस्थानचे माजी अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड व विश्वस्त राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. या देवस्थानच्या सरचिटणीसपदी जालिंदर महादू खोसे, कोषाध्यक्षपदी तुकाराम बाळाजी जगताप, तर चिटणीस म्हणून कमलेश अर्जुन घुले, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुरेश पांडुरंग फापाळे, अन्नदान कमिटी सुवर्णाताई घाडगे यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवनिर्वाचित विश्वस्त धोंडीभाऊ गोविंद जगताप, रामदास देवराम मुळे, जालिंदर महादू खोसे, महादेव पांडुरंग पुंडे, पांडुरंग विठ्ठल गायकवाड, शालिनी अशोक घुले, कमलेश अर्जुन घुले, तुकाराम बाळाजी
जगताप, दिलीप रामचंद्र घुले, चंद्रभान शंकर ठुबे, राजेंद्र भिकाजी चौधरी, सुवर्णा अतुल घाडगे, महेश भास्कर शिरोळे, सुरेश पांडुरंग फापाळे, अजित हरिभाऊ महांडुळे उपस्थित होते.
विश्वस्त निवडीत आमदार नीलेश लंके यांचा वरचष्मा दिसून आला. यावेळी सरपंच राहुल झावरे, अशोक घुले, साहेबराव चिकणे, बाळासाहेब पुंडे, सौरभ बेलकर, दिलीप जगताप, अमोल घुले, दादाभाऊ चिकणे, सुरेश
सुंबरे, पोपट सुपेकर, चंद्रकांत कुलकर्णी, श्यामा हवालदार, कारभारी घुले, गंगाराम कोळेकर, मार्तंड जगताप, बबन भांबरे, अक्षय जगताप, पुजारी शिवाजी क्षीरसागर, रमजान चौगुले, सोमनाथ क्षीरसागर, संघर्ष गणेश तरुण मित्र मंडळ व अशोक घुले मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मावळते अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड यांनी चंपाषष्ठी किंवा वार्षिक यात्रौत्सवासाठी नियोजन महत्त्वाचे असून सर्वांनी एक दिलाने व एक मनाने हातात हात घालून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. माझ्याकडे पद नसले, तरी मी पूर्ण वेळ या देवस्थानची व खंडोबाची सेवा करणार असल्याचे अॅड. गायकवाड यांनी सांगितले. माजी सरपंच अशोक घुले यांनी आमदार लंके यांच्या शिकवणीला कोणत्याही प्रकारचा तडा जाऊ न देता सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.