श्री बाळेश्वर विद्यालयात गरजु विद्यार्थींना गणवेश वाटप

भंडारदरा प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे ,श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार या विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री रमेशचंद्र बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त डाॕ. मोरे साहेब ,आश्रम शाळेचे प्राचार्य चंद्रकांत शिरोळे , मुख्याध्यापक सुदाम पवार, विद्यालयाचे प्राचार्य रमेशचंद्र बेनके जेष्ठ शिक्षक सुनील साबळे, भारत हासे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेचे जेष्ठ विश्वस्त डाॕ. मोरे साहेब बोलत होते. विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश देऊन विद्यार्थ्यांमधील दरी दूर करण्याचे काम आपण करत आहात ही बाब खूपच अभिमानास्पद आहे, विद्यार्थी हा केंद्रबिंदु मानुन सर्व गुणसंपन्न निर्माण झाला पाहिजे. गरीब विद्यार्थ्यांच्या मनात कोणताही न्यूनगंड निर्माण होऊ देऊ नका. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे चपळ व काटक असतात याचाच उपयोग करून विद्यालयाचे नाव लौकिक करावे.विद्यालयाचे प्राचार्य श्री .रमेशचंद्र बेनके यांच्या वाढदिवसा निमित्त गरजु विद्यार्थींना गणवेश व खाऊचे वाटप करून दातृत्व दाखविले.वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा !
संस्था दरवर्षी आदर्श विद्यालय पुरस्कार देत असते या वर्षीचा आदर्श विद्यालय पुरस्कार श्री बाळेश्वर आश्रमशाळा सारोळे पठार या आश्रमशाळेस प्राप्त झाल्याने आश्रम शाळेचे प्राचार्य श्री चंद्रकांत शिरोळे व मुख्याध्यापक सुदाम पवार यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गंगाधर पोखरकर, विश्वास पोखरकर ,अशोक जाधव, संतोष भांगरे,नारायण डोंगरे,श्रीकृष्ण वर्पे, बाळासाहेब डगळे, संजय ठोकळ,रघुनाथ मेंगाळ, चेतन ,सरोदे, हेमंत बेनके, आप्पासाहेब दरेकर ,विठ्ठल फटांगरे,जयराम रहाणे,औटी जी.के,मंगेश औटी, मनोहर कचरे मोहन वैष्णव आदी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भाऊराव धोंगडे यांनी केले तर सोमनाथ सलालकर यांनी आभार मानले .
