
संजय महानोर
भंडारदरा /प्रतिनिधी
महाराष्ट्राचे एवरेस्ट म्हणुन प्रसिद्ध असणा-या कळसुबाई शिखराची चढाई अवघ्या ४२ मिनिटात पुर्ण करण्याचा एक नविन विक्रम एका युवकाने नोंदविला
बारी( ता अकोले) येथील १९ वर्षाचा हा युवक आहे साजन तान्हाजी भांगरे असे या युवकाचे नाव आहे .
अकोले तालुक्यात पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वत रांगेत महाराष्ट्राचे एवरेस्ट म्हणुन कळसूबाईचे शिखर समजले जाते . समुद्रसपाटीपासुन १६४६ मीटर असलेल्या या शिखराची चढाई म्हणजे भल्या – भल्या गिर्यारोहकांची दमछाक होते .
साधारणतः हे शिखर सर करण्यासाठी गिर्यारोहक व सामान्य माणुस यांना शिखरावर जाण्यासाठी कमीत कमी दोन ते अडीस तासाचा कालावधी लागतो . पंरतु या चढाईसाठी बारीतीलच साजन तान्हाजी भांगरे १९ वर्षाच्या तरुणांने मात्र अवघ्या ४२ मिनिटात हे शिखर सर केले आहे .

साजन हा प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत २०१७ – १८ या वर्षी त्याने वारंघुशी मॅरेथाॅनही जिंकली होती . शाळेमध्ये खेळांच्या बाबतीत कायमच साजनची आघाडी असल्याचे समजते . परिसरातील गड किल्लेही महिन्यातुन दोनदा ते तिनदा हा आपल्या पायाखाली टाकत सह्याद्रीची भटकंती करत असतो . या अगोदरही साजनने एकदा ५० मिनिटे तसेच ४६ मिनिटात सर करण्याचा पराक्रम केला होता . पंरतु आता मात्र ४२ मिनिटात कळसूबाई सर करत साजनने स्वतःचाच विक्रम मोडला आहे . बारी ( जहागिरदार वाडी ) येथील गोपाळ कुंडलिक करटुले व सोमनाथ एकनाथ घोडे यांनी कळसूबाई शिखर ४७ मिनिटात सर करत परत तळाशी अवघ्या २७ मिनिटात पुन्हा तळाशी येण्याची किमयाही केलेली आहे.