SBI असोसिएशनचा कोरोना एकल महिलांसाठी मदतीचा हात…

अकोले प्रतिनिधी.
स्टेट बँक आँफ इंडिया आँफिसर्स असोसिएशन मुंबई मेट्रो अँड महाराष्ट्र सर्कल ने सामाजिक कर्तव्याची जाणीव ठेवून कोरोना एकल पुनर्वसन समिती ,महाराष्ट्र राज्य यांना एक लाख रूपयांची मदत केली
असोसिएशन च्या नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा शिर्डी येथे बैठक आयोजित केली होती यावेळी ही मदत त्यांनी केली
कोरो ना एकल समितीच्या वतीने प्रतिमा कुलकर्णी यांनी मा.श्री.सौम्या दत्ता, जनरल सेक्रेटरी AISBOF & AIBOC,मा.श्री.दिपक शर्मा प्रेसिडेंट AIBOF, मा.श्री.उदाराम हेडा प्रेसिडेंट,मा.श्री.भूषण महाजन जनरल सेक्रेटरी यांच्या हस्ते धनादेश स्विकारला.आम्ही सदैव या एकल महिलांच्या सोबत आहोत ,अशी भावना पदाधिकारी यांनी व्यक्त केली..
या कार्यक्रमासाठी राज्यभरातून ३०० पेक्षा जास्त नवनिर्वाचित सदस्य हजर होते. या रकमेचा विनियोग कोरोना एकल महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी केला जाणार आहे असे प्रतिमा कुलकर्णी यांनी सांगितले.
संवेदनशील अधिकारी मा.श्री.धनाजी भागवत ,मा.श्री. वैभव कदम यांनी या मदतीसाठी महत्वाचा पुढाकार घेतला./