अकोल्यात अनेक महाविद्यालयीन तरूण मटक्याच्या आहारी!

अकोले प्रतिनिधी
अकोल्यात अनेक महाविद्यालयीन तरुण मटक्याच्या आहारी गेले आहे तालुक्यात मटक्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे यात अनेक महाविद्यालयीन तरुण गुरफटले आहे यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी चे भविष्य अंधकारमय होत आहे
भर वस्तीमध्ये ठीक ठिकाणी मटका पेढी सुरू आहेत अकोले शहरात कारखाना रोड लगत हासे कॉम्प्लेक्स परिसरात तीन ठिकाणी मटका बुकी सुरू आहे या ठिकाणी सतत मटका शौकिनांची वर्दळ राहते यात अनेक प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्वसामान्य हातावरील पोट असणारे नागरिक तसेच महाविद्यालयीन तरुण देखील या मटक्या कडे आकर्षित होत आहे दिवसभरात अनेक तरुण याकडे फिरकत असल्याने मटका व्यवसायातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे घरून कॉलेजला जाण्याच्या नावाखाली अनेक तरुण दिवसभर मटका बुकीकडे गिरट्या घालत असल्याची दिसते मटका व्यावसायिकांनी आपल्याही व्यवसायात प्रगती केल्याचे दिसून येते महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली मटका बुकिंग साठी देखील आता महिलांना प्राधान्य दिले आहे मटका बुकिंग साठी महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे मटका व्यवसायात ही परिवर्तनाचे दिशेने वाटचाल करत आहे यातून दररोज मोठी उलाढाल होते यात मोठ्या अनेक प्रतिष्ठित लोक गुंतले असल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते मात्र अनेक गुन्ह्यांचा कसोशीने तपास करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे पोलीस अधिकारी मिथुन घुगे यानी गल्ली बोळात सुरू असलेली मटक्याच्या दुकांदारी बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे