श्रीगोंदयात श्री दत्तमंदिरातील मूर्तीची विटंबना आरोपींना तात्काळ अटक करा

श्रीगोंदा / प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील घायपतवाडी जवळील महामार्गालगत 50 वर्षापुर्वी चे श्री दत्त मंदिरातील दत्त मूर्तीची काही समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना करत मुर्ती मंदिराच्या बाहेर फेकून दिली यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सदर चे मंदिर हे जुने असून याठिकाणी दत्त जयंती ला औटेवाडी, श्रीगोंदा शहर, हिरडे वाडी दांडेकर मळा आळेकर मळा, सप्रे वाडी, कुदळे मळा,मेहत्रेमळा, आढळगाव, तसेच श्रीगोंदा बीड महामार्ग असल्यामुळे हजारो भाविक येत असतात.
हे दत्त मंदिर 50 वर्षांपासून आहे. दत्त जयंती ला हजारो भाविक येथे उत्सवास येत असतास.मूर्तीच्या खाली सोने असेल या संशयावरून अज्ञात चोरांनी मूर्ती काढून बाहेर टाकली असेल आणि मंदिरातील दोन पितळी घंटा चोरून नेल्या आहेत श्रीगोंदा पोलिसांनी तात्काळ या आरोपींना अटक करावी
अनिल हिरडे (सामाजिक कार्यकर्ते)
या मंदिरावर भाविकांची श्रद्धा असून काही अज्ञात लोकांनी चोरीच्या उद्देशाने या मूर्ती ची विटंबना करीत मूर्ती बाहेर फेकून देत मंदिरातील पितळी दोन घंटा चोरून नेल्या . त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

भाविकांच्या भावना दुखवल्याने संताप व्यक्त होत असून लवकरात लवकर या आरोपींना अटक करण्याची मागणी नागरिक करीत आहे. सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक ढिकले साहेब यांनी भेट दिली देऊन पाहणी केली