ना.बाळासाहेब थोरात सहकारी दूध संस्थेच्या वतीने सभासदांना दूध रिबेट व अनामतीचे वाटप.

संगमनेर /प्रतिनिधी
निमगाव पागा (ता संगमनेर )येथील अग्रगण्य असलेल्या ना. बाळासाहेब थोरात सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना दीपावलीच्या निमित्ताने दूध संघाच्यावतीने १ रुपया व दूध संस्थेच्या वतीने २ रुपये रिबेट दिले असून,एकूण ३ रुपये दूध उत्पादकांना मिळणार आहेत. दूध आनामात म्हणून ३ रुपये सभासदांना देण्यात आले आहे.
एकूण सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना ६ रुपये प्रमाणे संस्थेच्या वतीने आज देण्यात आले. आहेत. दि.२० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता ना.बाळासाहेब थोरात दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष . माधवराव कानवडे यांच्या हस्ते सभासदांना वितरण करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन ,व्हा. चेअरमन, सचिव, व सर्व संचालक मंडळ व कर्मचारी व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपावलीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सभासदांना तेल व साखरेचे देखील संस्थेचे अध्यक्ष एड. कानवडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.
संस्थेने सभासदांची हित जोपासण्यासाठी कायमच मदतीचा हात पुढे करेत, सभासदांना गाई खरेदीसाठी तातडीची मदत म्हणून कायमच सहकार्य करते, तसेच वेळप्रसंगी सभासदांना एक मायेचा आधार म्हणून या संस्थेकडे बघितले जाते. संगमनेर तालुक्यातील एक अग्रगण्य दूध संस्था म्हणून एक वेगळी ओळख या संस्थेने स्थापन केली असल्याचे मनोगत संस्थेचे अध्यक्ष कानवडे यांनी सांगितले.