इतर

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शेवगाव येथे दहन

शेवगाव प्रतिनिधी
ओला दुष्काळ जाहीर करण्या सारखी परिस्थिती नाही असे म्हणणार्‍या शिंदे सरकार मधील कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्याचे शेवगाव शहरात दहन करण्यात आले


भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने हे आंदोलन इ करण्यात आले . परतीच्या पावसाने महाराष्ट्रात थैमान घातले असून शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतला आहे. महाराष्ट्र सरकारची सद्य परस्थीतीत नैतिक जबाबदारी आहे की आपआपसातले वाद बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित असताना शिंदे सरकार मधील कृषि मंत्री अब्दुल सत्तार हे महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्या सारखी परिस्थिति नाही असे बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे अश्या कृषि मंत्र्याच्या पुतळ्याचे खाली डोके वर पाय करून जोडे मारून दहन करण्यात आले .
सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावून घेतला आहे अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट तातडीची मदत मिळावी अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली आहे

 भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे ,राज्य कौंशील सदस्य कॉम संजय नांगरे,संदीप इथापे , राम लांडे , दत्तात्रेय आरे , विष्णु उभेदळ ,शंकर देवढे , राजेंद्र खेडकर, बापुराव राशिनकर,रावसाहेब मगर, शामद सय्यद , अनिस  शेख,जकीर तांबोळी , जय मगर , देवीदास सकट ,राज गायकवाड , शंकर काथवटे , विजय मगर , सूरज निकाळजे , गोरख काते , आदि सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते  उपस्थित होते ,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button