चाईल्ड केअर तर्फे आदिवासी वाडीत दिवाळी वाटप

हेमंत सुरेश देशमुख
चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड तर्फे दि 24/10/2022 रोजी वेश्वी आदिवासी वाडी मध्ये साखर, मैदा, रवा, तूप, तेल, उटणे, चिवडा, तांदूळ असे दिवाळीचे किराणा सामान आदिवासी बंधु भगिनी ना वाटप करण्यात आले
हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले या कार्यक्रमाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील पत्रकार श्रेत्रात उलाखनीय कार्य करणारे श्री मिलिंद खार पाटील यांना चाईल्ड केअर सामाजिक संस्था चे संस्थापक -अध्यक्ष श्री विकास कडू यांच्या हस्ते “उरण विशेष सम्मान 2022″या पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले.
तसेच उरण तालुक्यातील भेंडखळ गावातले सुपुत्र श्री राजेश ठाकूर अभिनय श्रेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्यांचे संस्थापक -अध्यक्ष श्री विकास कडू यांच्या हस्ते विशेष सम्मान करण्यात आला..
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विकास कडू म्हणाले की “समाजातील असे काही घटक आहेत कि त्यांना दोन वेळचे जेवण ही मिळत नाही त्यांना आपण काहीतरी समाजा चे देणे लागतो हे ब्रिज लक्षात घेऊन चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण,रायगड. आदिवासी वाड्यामध्ये या बंधू भगिनींना थोडे का होईना सुख समाधान मिलेलं असे छोटे छोटे उपक्रम राबवत आहे. त्यातलाच हा एक उपक्रम म्हणजे आदिवासी वाडी मध्ये दिवाळी सामान चे वाटप. हे कार्य करताना आम्हाला सर्व सभासदांना खूप आनंद होत आहे”
महादेव घरत यांनी आपले मनोगत मांडताना म्हणाले कि “चाईल्ड केअर सामाजिक संस्था खूप मोलाचे कार्य करत आहे त्यांची सम्पूर्ण उरण तालूक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यात कौतुक, होत आहे या पुढेही संस्था खूप मोठे मोठे कार्य करेल यात काही शंका नाही संस्थेचे संस्थापक श्री विकास कडू यांचे करावे तितके कौतुक कमी पडेल त्यांनी ही संस्था सात वर्ष चांगल्या पद्धतीने चालवली आहे”
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री नारायण तांडेल (सोनारी )श्री जितेंद्र ठाकूर (सावरखार) ,कु उद्धव कोळी (मोरा )सौ नीता डाऊर (महाराष्ट्र पोलीस) डॉ. सौ स्वाती म्हात्रे (आवारे ), अध्यक्ष -झेप सामाजिक संस्था), माउली बचत गट भेंडखळ,कु. कुणाल पाटील (पागोटे )श्री जयप्रकाश पाटील (नवघर) सौ नितीशा पाटील,सौ वृषाली ठाकूर (भेंडखळ ), सौ वर्षा म्हात्रे, शिक्षिका (कुभारवाडा )श्री सुजित तांडेल (पागोटे )यांनी मोलाचे सहकार्य केले

तसेच संस्थे तर्फे मनोज ठाकूर (जसखार),तुषार ठाकूर,राजेश ठाकूर (भेंडखळ), निवृत्ती ठाकूर (धुतूम )ह्रितिक पाटील (नागाव ), अभिषेक माळी (बालई)आदित्य पारवे (उरण ) या सभासदाने ही योगदान दिले
यावेळी.प्रमुख उपस्थिती म्हणून श्री महादेव घरत साहेब (अध्यक्ष -द्रोणागिरी स्पोर्ट असो. ) श्री नारायण तांडेल (अध्यक्ष जासई विभाग)( श्री रमणिक म्हात्रे (संचालक-शिक्षक पतपेडी संस्था )हे उपस्थित होते
संस्थेकडून श्री विकास कडू (संस्थापक)श्री विक्रांत कडू (कार्यध्यक्ष)श्री तुषार ठाकूर (उपाध्यक्ष )श्री निवृत्ती ठाकूर (उपाध्यक्ष )कु ह्रितिक पाटील (उपाध्यक्ष )कु अभिषेक माळी (सचिव )कु उद्धव कोळी,कु आदित्य पारवे, कु हर्षद शिंदे, कु धीरज घरत, कु, रोशन धुमाळ, कु विवेक कडू हे उपस्थित होते तसेच वेश्वी आदिवासी वाडीतील शेकडो बंधू भगिनी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विकास कडू यांनी मांडले तर सूत्रसंचालन श्री रमणिक म्हात्रे यांनी केले आभार प्रदर्शन श्री विक्रांत कडू यांनी केले