इतर

पिंपळगाव नाकविंदा येथे महालक्ष्मी विदयालयात माजी विदयार्थ्याचा स्नेहमेळावा .


अकोले/प्रतिनिधी-
मैत्री शाळेतील बाकांवरची,आठवणींच्या नात्यांची.चला उजाळा देऊया बालपणींच्या आठवणींना.याच भावनेतुन अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी विदयालयात शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत गतकाळातील अविट पण घट्ट मैत्रीचे ऋणानुबंध जपताना सर्वांच्या चेहऱ्यावरचे कमालीचे ते आनंदाचे भाव आपापल्या क्षेत्रात उत्तुंग झेप घेत केवळ स्नेहाचे बंध जपण्यासाठी आपल्या लाडक्या गुरूजनांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी एकत्र येण्याची उर्मी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने दिसून आली.

आपल्या मित्रांना एकत्र येण्याने झालेला आनंद शब्दापलीकडे होता.ऍड.वसंत मनकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी उपजिल्हाअधिकारी नितिन सदगिर,माजी उपसभापती मारूती मेंगाळ,कार्यकारणी सदस्य बबन आभाळे,प्रमोद मंडलिक,संजय शिरसाठ यांच्या उपस्थित झालेला हा मेळावा जणू काही सर्वांनाच एक प्रभावी ऊर्जा व नवचैतन्य देऊन गेला.


यावेळी प्राचार्य सुनिल धुमाळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांसह सन १९९८ते २०२१या वर्षातील तब्बल २६२ माजी विदयार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.वसंत मनकर यांनी पेरले ते उगवले ते डौलाने बहरले असल्याचा आनंद व्यक्त करत मैत्री टिकवा.मैत्री ज्याच्याकडे त्याला संपत्तीची गरज नाही.असे विचार व्यक्त करून प्राचार्य सुनिल धुमाळ यांसह सर्व शिक्षकवृंदांचे भरभरून कौतुक केले.
उपजिल्हाअधिकारी नितीन सदगिर यांनी ओसाड माळरानावरील ज्ञान मंदिरातील कार्य वाखान्याजोगे असून स्वभावावर व्यक्तीमत्व घडत असते.व्यक्तीमत्वाला घडविण्याचे कार्य शिक्षक करत असल्याचे विचार व्यक्त केले.
माजी उपसभापती मारूती मेंगाळ यांनी ज्यांनी शिकवले,घडविले त्यांना विसरू नका.शाळेतील मैत्रीत वेगळे नाते जपले जाते.किती मोठे व्हा पण आपल्या शाळेशी जोडली गेलेली नाळ तोडू नका कारण स्नेह मेळाव्याचा खरा सन्मान गुरूजनांचा असल्याचा आशावाद व्यक्त केला.

या प्रसंगी वर्षा मालुंजकर,गणेश कोकणे,वृषाली कासार, नवनाथ लगड,संतोष बंगाळ,विश्वास पथवे, गोरक्ष आढळ,देवचंद काळे,बबन कासार,भाऊसाहेब लगड,वैभव कासार,प्रकाश कासार,भाऊपाटील बगनर,सुनिता बगनर, विजया कासार, हर्षदा कदम,मारूती आभाळे आदी माजी विदयार्थ्यानी जुन्या आठवणींना उजाळा देत गुरूजनांप्रती ऋण व्यक्त केले.
यावेळी प्रशासकीय,सैन्यदल,पोलीस,शिक्षक, उदयोग,कृषी,राजकीय,आरोग्य आदी क्षेत्रात कार्यरत विदयार्थ्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य सुनिल धुमाळ यांनी केले. रामदास कासार यांनी सुत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सुरूवात माणसाने माणसासम वागणे या प्रार्थनेनी केली तर मासवडी,लापसी या स्नेहभोजनाने शेवट करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,आजी विदयार्थी आदींनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button