इतर

सलून व्यवसायिकाच्या मुलीची गरुड झेप..
उदया परदेशात रवाना


विलास तुपे

राजूर प्रतिनिधी

आजकाल इतर समाजाप्रमाने पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत नाभिक समाजातील मुलीही सर्वच क्षेत्रात आगेकूच करताना पहावयास मिळत आहेत.कुणी परीक्षेत पहिली आली म्हणून, तर कुणी स्पर्धा परीक्षा द्वारे सरकारी अधिकारी,इंजिनीयर अथवा डॉक्टर, झाली म्हणून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.समाजातील कराडच्या अपेक्षाने तर सलून व्यवसायात ऐतिहासिक असे धाडसी पाऊल टाकून संपूर्ण सलून व्यवसायात क्रांती घडविली आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे या रणरागिणीनी कुठंही आपल्या खडतर परिस्थितीच भांडवल न करता केवळ अफाट मेहनत आणि चिकाटीच्या जिद्दीवर समाजातील मुली यशाचे नवनवीन शिखरांना गवसणी घालताना समाजाचा स्वाभिमान दिवसेंदिवस उंचावत आहे.
अशाच एका जिद्दी आणि कष्टाळू सलून व्यवसायिकाच्या मुलीने आपल्या बेताच्या परिस्थितीवर मात करून आणि रात्रंदिवस अभ्यास करून नाभिक समाजाचा झेंडा अटकेपार नेण्याचा नावलोकिक मिळविला आहे.
अहमदनगर जिल्हा पारनेर तालुक्यातील कळस या छोट्या खेड्यात वाढलेल्या प्रगती साहेबराव वाघमारे या मुलीने आपल्या खडतर परिस्थिवर मात करून हे यश संपादन केले आहे.
साहेबराव गजानन वाघमारे यांचे कळस या गावी छोटेसे सलून दुकान आहे. परिस्थितीमुळे स्वतः न शिकलेल्या साहेबराव वाघमारे यांनी पडेल ते कष्ट आणि मेहनत करून आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले.मुलगा प्रकाश फार्मसी करून नामांकित कंपनीत सर्व्हिस करीत आहे.तर मुलगी प्रगती हिने संगमनेर येथील अमृतवहिनी कॉलेजमधून आपली ईएनटीसी या इंजिनीयर शाखेची पदवी घेतली आहे.
पदवी नंतर प्रगतीने पुणे येथून जपानी भाषेचा अभ्यास केला आणि जवळ जवळ तीन लेव्हल तिने यशस्वीपणे पूर्ण केल्या.
लागलीच तिच्या या मेहनतीची दखल फुजीत्सू या जपानी कंपनीनेघेतली आणि जपानमधील ऑफिस साठी तिची निवड कण्यात असली आहे.
प्रगती उद्या सोमवार दिनांक ३१ रोजी जपानला प्रयाण करणार आहे.
अफाट जिद्द,कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर प्रगतीने हे आकाशाला गवसणी घालणारे यश संपादन केले आहे.
सकल नाभिक समाजाला गर्व वाटावा असा नाभिक अस्मितेचा झेंडा आज तिच्या रूपाने साता समुद्रापार जात आहे.
प्रगतीच्या या नेत्रदीपक यशाचं राज्यभरातील नाभिक समाज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मनपूर्वक कौतुक होत असून तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button