बाळासाहेब भारदे हायस्कूल मध्ये जुन्या मित्रांचा आनंद मेळा

शेवगाव प्रतिनिधी
बाळासाहेब भारदे हायस्कूल च्या 1970 ते 2001 बॅच च्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी हायस्कूल च्या प्रांगणात आपल्या गुरुजनांसह जुन्या मैत्रीला उजाळा दिला
“चला पुन्हा शाळेत जाऊ…! मैत्रगंध” या शालेय विद्यार्थी व विद्यार्थींनीच्या समूहाने ही अभिरूप शाळा भरवली. माजी प्राचार्य श्री.एस.व्ही.कुलकर्णी सर प्रमुख पाहुणे तर अध्यक्षस्थानी रमेशराव भारदे सर होते.शालेय जीवनात शिक्षणासह संस्काराचे धडे देणारे सर्व शिक्षक हजर होते. अनेक वर्ग मित्र व

मैत्रीणी आज विविध ठिकाणी विविध हुद्द्यांवर आपली जबाबदारी चोख पणे सांभाळत . कुणी शिक्षक, डॉक्टर,वकील,इंजिनियर,पोलिस तर कोणी व्यावसायिक जबाबदा-या पार पाडत आहेत.
हे मित्र महाराष्ट्रातील ठाणे,धुळे,नाशिक,पुणे, संभाजीनगर अशा विविध भागात अनेकजण

स्थिरावले आहेत.जीवनातील चांगले व कटू अनुभव तसेच शालेय जीवनातील अनेक आठवणी विविध मित्रांनी व मैत्रिणींनी या वेळी जागविल्या . शालेय जीवनातील मित्र मैत्रणिं च्या आठवणी नी आज विद्यालयात ओथंबून वाहत होते
