अकोल्यात फोटोग्राफी कार्यशाळा संपन्न

अकोले , संगमनेर ,सिन्नर ,जुन्नर तालुक्यातील
फोटो ग्राफर ची उपस्थिती
अकोले/प्रतिनिधी
अकोले तालुका फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशन ने आयोजित केलेल्या फोटोग्राफी कार्यशाळेमधे प्रशिक्षक सचिन भोर यांनी वेडींग व प्री-वेडींग फोटोग्राफी या खुप महत्वाच्या विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
कार्यशाळा चे उद्घाटन अकोले तालुक्याचे लाडके आमदार डॅा. किरण लहामटे यांनी केले. याप्रसंगी अकोले, संगमनेर, सिन्नर व जुन्नर येथिल फोटोग्राफर असोसिएशन चे पदाधिकारीही उपस्थित होते तसेच तालुक्यातील सर्व फोटोग्राफर्सने उपस्थित राहीले.
अकोले, संगमनेर व सिन्नर अशा तिन तालुक्यांतून ३४ फोटोग्राफर्सने या कार्यशाळेमधे उत्स्फुर्त सहभाग घेतला.
वेडींग इनडोअर फोटोग्राफी करताना लाईटींग, नवनवीन कॅमेरा ट्रिक्स-टेक्निक्स, फोटोग्राफीतील कलात्मकता, रंगसंगती, चेहर्याचे आकार व लाईटींग चे प्रकार, गोडोक्स पोर्टेबल लाईट व वेगवेगळ्या मॅाडीफायर्स चा कुशल वापर, आर्ट ॲाफ पोझिंग, पोझिंग किट चा वापर अशा एक न अनेक विषयांचे बारकावे प्रात्यक्षिंकासह सोप्या भाषेत समजावून स्क्रिनवर लगेच रिझल्ट पहायला मिळाल्याने सहभागी फोटोग्राफर्सचा उत्साह अजूनच वाढला. वेडींग फोटोग्राफी हे एक खुप सुंदर, जबाबदारीचे व कुशल काम असल्याने फोटोग्राफरची कलात्मकता विवाह समारंभ असणार्या कुटूंबाच्या आयुष्यभराच्या स्मृती संग्रहीत करत असतो. वास्तविकपणे विचार करता वेडींग फोटोग्राफरला विवाह समारंभाच्या गतीनेच आपले काम करावे लागते म्हणूनच वेळेचा बंधन पाळीवे लागते त्याचमुळे रोज स्वतःला अपडेट ठेवणे ही काळाची गरज झाली आहे. फक्त कॅमेरा अथवा वस्तू बदलून नाही चालत नाही तर दृष्टीकोनही बदलणे तेवढेच जरुरी आहे. कलात्मक दृष्टीकोन सुंदरतेने वापरुन एका विवाह समारंभाला आयुष्यभर जपताना फोटोग्राफरकडे आजच्या काळातील मुलामुलींची आवड निवड लक्षात घेवून अपडेट रहाणे अत्यंत जरुरी आहे. हेच महत्व जाणून अकोले तालुका फोटोग्राफर्स व व्हिडीओग्राफर्स असोसिएशनने एक सुंदर संधी आपल्या फोटोग्राफर्ससाठी उपलब्ध केली व भारतातील कलात्मक फोटोग्राफी व प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. सचिन भोर यांना आमंत्रित केले.
श्री. सचिन भोर हे फाईन आर्टस् बॅकग्राउंडचे असल्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने पोर्टेट, पोझिंग, लाईटींग व फ्रेमिंग अतिशय सोप्या पद्धतीने सांगत असताना सर्व फोटोग्राफर्स च्या चेहर्यावर एक विलक्षन आनंद दिसला.
साधारण ३ वर्ष ते २० वर्षे अनुभव असलेले सर्व स्तरातील फोटोग्राफर्स अगदी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असल्यासारखे प्रांजळपणे हसत खेळत नवनवीन गोष्टी शिकले. लहान मोठे सर्वच एकत्रितपणे जणूकाही आपल्या फोटोग्राफी इंडस्ट्रीला एकीचा संदेश दिला.
श्री. सचिन भोर यांची भारतीय फोटोग्राफी इंडस्ट्रीला असलेली ओळख की हे हातचे काही राखून ठेवत नाही व मनसोक्त ज्ञान देत असतात त्याचा प्रत्यय सर्व फोटोग्राफर्सने घेतला.
पहिला दिवस कसा संपला हे तर कुणालाच समजले नाही.
दुसरा दिवस हा प्री-वेडींग फोटोग्राफी विषयाचा पहाटे ६ वा सुरु झाला व सर्व फोटोग्राफर्स अगदी निसर्गाचा आनंद घेत नदीतीरी ६.३० वा पोहचले व हिवाळ्यातील धुके, पाण्यावर दरवळणार्या धुक्याची मनाली भूरळ घालणारे दृष्य पाहून सर्वजण भारावून गेले व निसर्गात जे शिक्षण घेतले जाते ते खोलवर जावून पोहचते, त्याचा परिणाम हा सर्वांगाने होतो याचा प्रत्ययच जणूकाही आला.
आऊटडोअर फोटोग्राफीतील लाईटींग च्या टेक्निक्स, तसेच प्री वेडींग पोझिंग, कम्पोझिशन, कॅमेरा ॲंगल्स व क्रिएटीव्ह फोटोग्राफीचे विविध प्रात्यक्षिके अनुभवताना सर्वच फोटोग्राफर्सने स्वतःही फोटोग्राफी केली.
कम्पोझिशन म्हणजे नेमके काय व त्यातिल फ्रेमिंग, Rule of Thirds, Golden point, Frame into frame, Repetition of forms, Patterns, Textures, Interest, Contrast etc. हे सर्व बारकाईने समजून घेताना फोटोग्राफर्स ला खुप मज्जा यायला लागली. याचसोबत कॅमेरा ॲंगल द्वारे एखादी फ्रेम कशी प्रभावीपणे बदलते याची अनुभव प्रात्यक्षिकाने सर्वांनी घेतला. Sprouting नावाचा काहीतरी प्रकार असतो व त्यामुळे सुंदर फोटो विचित्र कसा दिसू शकतो हे सचिन सरांनी दाखविल्यानंतर तर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले, आणि खुप महत्वाची गोष्ट माहीत झाल्याचा आनंद झाला.
नदीपात्रातील प्रात्यक्षिके संपवून जवळच असलेल्या निसर्गसंपन्न गावात म्हणजेच गर्दनी येथे पुढच्या टप्प्यात कार्यशाळा पोहचली आणि आपण दक्षिण भारतातील निसर्गसौंदर्याच्या नेहमीच प्रेमात पडतो परंतु जवळ असलेल्या निसर्गाकडे दूर्लक्ष करतो की काय असे सर्वांना वाटून गेले कारण सचिन सरांनी पपई ची बाग शूट साठी निवडली व जणूकाही आपल्यासाठीच ही बाग सजली आहे की काय असे वाटू लागले. पपई च्या झाडाची पाने व त्यांची डिझाईन सोबतच जवळपास १००-१५० झाडांची बाग फोटोमधे सुंदरता कशी निर्माण करते याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांना मिळाला. यामधे आउटडोअर लाईटींग चा ॲंगल व कॅमेरा ॲंगल चा मेळ कसा घालावा हे दाखविण्यात आले. रिफ्लेक्टचा वापर किती महत्लाचा रिझल्ट देतो हे ही पहायला मिळाले.
तेथेच असलेला लोखंडी पुलावर सुद्धा खुप सुंदर शूट केले गेले.
त्यानंतर अजून पुढे प्रवास करुन जवळच असलेल्या धबधब्याजवळ सर्व कलाकार पोहचले. अतिशय मनमोहक धबधब्याने तर चार चांद लावले. धबधब्याजवळ सुंदर फोटोशूट करताना स्लो-शटर चा क्रिएटीव्ह वापर, मल्टी लाईटस्, डिफ्यूजर चा वापर, पोझिंग व फ्रेमिंगबद्दल खपप महत्वाचे शिक्षण प्रात्यक्षिकासह देण्यात आले. सर्वांनी सराव केला, प्रश्नोत्तरे सुरुच होती. आयोजकांचे चोख नियोजनामुळे सर्वकाही सहजसहज शक्य होत होते.
पुढे हॅाटेल च्या हॅाल मधे स्क्रिनवर सर्व फोटोज दाखवून सचिन भोर सरांनी त्यातील कम्पोझिशन, ॲंगल, लाईटींग, लोकेशन कसे निवडावे व त्यामागील विचार कसे करावे याबदद्ल इथंब्बूत माहीती दिली. फोटोशॉप मधे २-३ फोटोची एडीट करुन दाखविण्यात आले.
वेडींग फोटोग्राफर्स ला पॅकेज कसे बनवावे याबद्दल अतिशय महत्नाचे मार्गदर्शन सचिन भोर यांनी सोप्या पद्धतीने केल्याने सर्वांचेच मनातले प्रश्नांना उत्तर मिळाले.
वेडींग फोटोग्राफर्सने स्वतःला प्रोफेशनल पद्धतीने अपडेट करुन आपल्या प्रोफेशनचा रिस्पेक्ट, स्वतःचा रिस्पेक्ट केला तर समाजही आपल्याला रिस्पेक्ट करतो, त्यासाठी आपले राहणीमान, वागणे-बोलणे, प्रेझेंटेशन इ. सर्वच बाजूने स्वतःचा विकास केला तर प्रत्येक वेडींग फोटोग्राफर आर्थिक सक्षम होईल यांवर सचिन सरांनी मार्गदर्शन केले.
आपल्या करिअर ला पुढे नेताना हेल्थ इंन्शुअरन्स, मेडीक्लेम, पॅालासीज व ट्रेन प्लॅन किती महत्वाचा आहे यावर सखोल मार्गदर्शन मिळाल्याने कार्यशाळा फक्त फोटोग्राफी पूरती मर्यादित न रहाता फोटोग्राफर्स चा सर्वांगाने विकास यावर मोटिवेशनल सुद्धा झाली.
सहभागी सर्व फोटो-कलाकारांना अकोले तालुका फोटोग्राफर्स-व्हिडीओग्राफर्स असोसिएशन तर्फे सर्टिफीकेट देण्यात आले याक्षणी आळेफाटा येथील प्रथितयश फोटोग्राफर श्री भाऊ मेंगडे व सौ. रेखा मेंगडे हे ही उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष श्री दिपक नवले व सचिव श्री प्रविण नाईकवाडी यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले.
कार्यक्रमाचे निवेदन संस्थेचे उपाध्यक्ष श्री संदिप दातखिळे यांनी केले.
सहभागी फोटो-कलाकांरांनी दोन दिवसाच्या अनुभवावर खुप सुंदर मनोगते व्यक्त केले.
