सावरचोळ (मेंगाळवाडी) बिरोबा महाराज यात्रा उत्सवात सुरुवात.

संगमनेर प्रतिनिधी :;
संगमनेर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगावर वसलेल्या श्रीक्षेत्र विरोबा महाराज यात्रा उत्सवात.. मीती कार्तिक शुद्ध!!१३ रविवार दि.६/११/२०२२ ते कार्तिक पोर्णिमा मंगळवार दि.८/११/२०२२ पर्यंत यात्रा उत्सवात सर्व भाविक भक्तांच्या व साधुसंतांच्या कृपाशीर्वादाने संगमनेर तालुक्यातील सावरचोळ (मेंगाळवाडी) व जुन्नर तालुक्यातील पांगरी परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने बिरोबा महाराज देवस्थान यात्रा उत्सवाचे आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात होणार आहे.

बिरोबा महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.६ रोजी बिरोबा महाराज मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम, व १५ व्या वर्धापन दिनानिमित्त संध्या ६/३०/ते ७/३० या वेळेत हरिपाठ, रात्री ७/३० ते ८/३० सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसाद, व त्यानंतर रात्री ९ ते ११ वाजता समाज प्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख यांचा हरी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवार दि. ७ रोजी पहाटे ४ ते ६ बिरोबा महाराज यात्रा उत्सवात देवाच्या महा.अभिषेक व होमवनाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ ते १० या वेळेत देवाची सत्यनारायण महापूजा, संध्य ७ ते ९ काठी मिरवणूक व देवाची भेट, रात्री ९ ते १२ जुन्नर तालुक्यातील मढ पांगरी येथील भजनी भारुडाचा कार्यक्रम, रात्री बारानंतर देवाचे वाण व फडाचे कार्यक्रम होणार आहेत.

मंगळावर दीं.८ रोजी सकाळी ५/१५ वाजता देवाकडून वार्षिक वाहिक सांगण्यात येईल.व साय.४ ते ६ या वेळेत जंगी कुस्त्यांचा हगामा हा कार्यक्रम होणार आहे.

तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी बिरोबा महाराज यात्रा उत्सव शांततेत व आनंदात साजरा करून.. कृपाशीर्वाद घ्यावेत असे सावरचोळ मेंगाळवाडी येथेल ग्रामस्थ व मढ पांगरी येथील भाविक भक्त व ग्रामस्थांनी आव्हान केले आहे.
