क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे कल्याण येथे भव्य स्मारक उभारणार – आमदार विशवनाथ भोईर

कल्याण/ प्रतिनिधी
कल्याण येथे मंगळवार दि.८/११/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता आधारवाडी जेल येथे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची २१८ वी जयंती संपन्न झाली. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुंबई/कोकण विभाग यांच्या वतीने व तमाम आदिवासी सामाजिक संघटनाच्या व समाज बांधवांच्या वतीने आ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कल्याण शहराचे आमदार. विशवनाथ भोईर व सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. डॉ. रवींद्र जाधव (अध्यक्ष संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य), हे उपस्तित होते तसेच या कार्यक्रमासाठी मुंबई शहरातून व कल्याण शहरातील विविध क्षेत्रातून मान्यवर उपस्थित होते. यात १)श्री. जैवंत भोईर (माजी नगरसेवक), २) शीतल ताई मंढारी (माजी नगरसेविका), ३) श्री. भागाजी भांगरे (सहा आयुक्त), चारुशीला मेमाणे (लेखा अधिकारी कल्याण),४) सौं. सविता हिले (सह आयुक्त), श्री. भरत बुळे साहेब (सुरक्षा अधिकारी), लक्ष्मण साबळे ( समाजसेवक), श्री. मंगेश शेळके, शिला नवाळे (मुंबई अध्यक्ष परिषद), सौं. हिराबाई आवारी, डॉ. सुरेखा जाधव (कार्याध्यक्ष संविधान संघ), श्री. बजरंग तांगटकर (आम्ही नगरकर ग्रुप), दिगंबर नवाळे, श्री. दत्तात्रय भुयाळ (माजी नागसेवक), नारायण जाधव (खडकपाडा पोलीस स्टेशन) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तित होते.

आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची जयंती साजरी करणे म्हणजे आदिवासी समाजातील नव्या पिडीला विचारांचा वारसा मिळावा व राघोजी यांची दुर्लक्षित असलेली क्रांती नवतरुणांना समजावी इंग्रज व सावकरांच्या अन्यायपासून गोरगरीब जनतेची सुटका व्हावी या साठी राघोजी यांनी अनेक लढे दिले स्वातंत्र्य च्या इतिहासाची पाने पुन्हा पुन्हा चाळली तर लक्षात येते कि आदिवासी समाजातील क्रांती विरांचा प्रथम उल्लेख केल्या शिवाय स्वातंत्र्य लढ्या चा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही असे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपल्या भाषणात संगीतले म्हणून कल्याण शहरात ऐतिहासिक मानाचा तुरा म्हणून आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे भव्य स्मारक मी माझ्या आमदार निधीतून पूर्ण करणार असल्याची। घोषणा त्यांनी यावेळी केली

आदिवासी समाजाला जर न्याय मिळून द्यायचा असेल तरं भारतीय राज्य घटनेने व संविधानाने दिलेला मुलमंत्र,समता, स्वातंत्र्य, बंधुता, हे या निमित्ताने जोपासणे गरजेचे आहे तरच आदिवासीचा इतिहास जिवंत राहील असे डॉ. रवींद्र जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या कार्यकमाचे नियोजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष मधुकराव पिचड यांच्या प्रेरणेने व रामनाथ भोजने (मुंबई /कोकण अध्यक्ष), चेतन मेमाणे (मुंबई युवा अध्यक्ष) , वाळीबा पोपरे (उपाध्यक्ष), यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अभियंता श्री जाधव ,श्री महाले सर, यांनी उपस्थितांचे आभार मानले.
