देशसेवा, निस्वार्थ समाजसेवा करण्याची भावना प्रत्येकाने मनात ठेवावी-अण्णा हजारे

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
–विश्व हिंदू परिषदेचे हितचिंतक झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे.विश्व हिंदू परिषद धार्मिक कार्य करणारी संघटना आहे.विश्व हिंदू परिषदेचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे.विश्व हिंदू परिषद निस्वार्थपणे समाज कार्य करणारी एकमेव संघटना आहे.संत यादव बाबा मंदिरात राहून संपत्ती,सत्ता व धन यांचा मोह न ठेवता, स्वतःचा परिवाराचा समाजासाठी त्याग करून मंदिरात जीवन व्यतीथ केले आहे.मिळालेले सर्व पुरस्कार हे गावाला दिले आहेत. म्हणूनच समाजसेवेचे मोठे कार्य करू शकत आहे.समाजसेवा करण्याची ऊर्जा या मंदिरातूनच मला मिळत आहे.देशसेवा,त्याग, समर्पण व निस्वार्थ सेवा करण्याची भावना प्रत्येकाने मनात ठेवावी असे प्रतिपादन पद्मविभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या हितचिंतक अभियानात विशेष संपर्क म्हणून पद्मविभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.याप्रसंगी मुंबई- गोवाचे बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे जिल्हा सहमंत्री मुकुल गंधे,पारनेर प्रखंडमंत्री सचिन शेळके आदी उपस्थित होते
. विवेक कुलकर्णी म्हणाले,विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे हितचिंतक अभियान संपूर्ण देशभर सुरू आहे.हे अभियान दर तीन वर्षांनी घेण्यात येते.हिंदू समाज हा वेगवेगळ्या जातीपाती मध्ये विखुरलेला आहे.सर्व हिंदू एक आहेत.या भावनेने विश्व हिंदू परिषद घरोघरी संपर्क करून हिंदू परिवार जोडण्याचे कार्य करीत आहे.या हितचिंतक अभियानास समस्त हिंदू समाजाचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.विश्व हिंदू परिषदेच्या ईश्वरीय कार्याला व धर्म कार्याला बळ देण्यासाठी सर्व हिंदू समाजाने हितचिंतक व्हावे. असे आवाहन त्यांनी केले आहे. मुकुंद गंधे यांनी आभार मानले.