पद्मश्री राहिबाई पोपेरे, पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी पुत्र फाउंडेशन चा पार पडला पुरस्कार सोहळा

अकोले प्रतिनिधी
शेतकरी पुत्र फाउंडेशन आयोजित नॅशनल ग्रेट अचिव्हर्स अवॉर्ड 2022 पुरस्कार सोहळा नुकताच अहमदनगर या ठिकाणी मंगळवार( दि. 8) रोजी पार पडला.
यावेळी प्रमुख अतिथी पद्मश्री राहिबाई पोपेरे, आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार , गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर कैलास मामा राऊत , युवा उद्योजक किशोर भाऊ भनगे उपस्थित होते
. या पुरस्कार सोहळ्यात प्रगतशील शेतकरी, युवा शेतकरी, उद्योजक व तसेच कृषी मार्गदर्शन, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पोपटराव पवार यांनी आपण दोन पावले मागे येऊन शेतकऱ्यांना चार पावले पुढे येण्याची संधी द्यावी असे आव्हान करत शेतकरी पुत्र फाउंडेशन चे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी जैविक शेतीकडे कशी व का वाटचाल करावी याबद्दल मार्गदर्शन या सोहळ्याच्या निमित्ताने केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
युवा उद्योजक किशोर भाऊ भणगे यांनी शेतकऱ्याचा विकास जर करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. तसेच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिकेत शेळके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेती करताना माल पिकवणे व विक्री करणे हा उद्देश न ठेवता बिझनेस दृष्टिकोन बाळगून शेती करा व शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकजूट राहून काम करा असे आव्हान शेतकऱ्यांना केले.
या कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी पुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत शेळके, उपाध्यक्ष कृष्ण पाठक, सचिव रोहन ढेरे, खजिनदार शुभम सुद्रिक, सल्लागार ऋषिकेश पाठक, सहसचिव सौरभ निकम, अक्षय तनपुरे व प्रतीक टाके यांनी केले होते.
🔸
शेतकरी पुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत शेळके हे गेल्या दोन वर्षभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम करत आहेत.महाराष्ट्रामध्ये शेतकरी पुत्र युट्युब चॅनेल कांदा पिकांमध्ये एक नंबर चालतो. शेतकऱ्यांसाठी कृषी मेळावे, जैविक शेती शाळा, गट शेती शाळा, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन, असे अनेक उपक्रम अनिकेत शेळके व त्यांचे इतर सहकारी यांच्या नियोजनातून फाउंडेशन तर्फे उपक्रम राबवले जातात. वयाच्या 22 व्या वर्षी सहा तरुण शेतकऱ्यांच्या पोरांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फाउंडेशन ची स्थापना केली आहे.