इतर

शिष्यवृत्ती परीक्षेत अगस्ति विद्यालयाचे नेत्रदीपक यश

अकोले — महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीच्या अगस्ति विद्यालयाच्या तब्बल बत्तीस विद्यार्थ्यांनी अत्यंत नेत्रदीपक यश मिळवत विद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे . इयत्ता 5 वी व 8 वी ला प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अशा प्रकारची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करीत असते . अकोले तालुक्यातून इतक्या मोठ्या संख्येने शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी अगस्ति विद्यालयातील झळकल्याने पालकवर्गातून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत असल्याचे चित्र दिसत आहे . विद्यालयाचा विद्यालयातील सोनवणे अर्णव , मंडलिक दिक्षा , दराडे प्रणिता , वैराळ आर्या , आभाळे स्वराली ,नवले ईश्वरी , नाईकवाडी सर्वेश , धुमाळ स्वरा , जाधव वैष्णवी , दिघे पियुष , मुठे ओंकार , चव्हाण मनस्वी , उघडे तनिष्का , चौधरी संस्कृती , कदम यशराज ,पोखरकर आदित्य, नवले आरोशी , डगळे श्रेया तर 8 वी तील साई गोर्डे , आदित्य कोंडार , कृष्णा मोहिते, यशोधन हासे, ईश्वरी भोसले, कार्तिक आवारी,श्रेयस लांडे,वैष्णवी काळे,सुयश खाडगिर ,तीर्था रंधे ,सावनी शेळके,सायली नवले, कावेरी गोर्डे, श्रुती सोनवणे , कस्तुरी राहाटाळ ,ओंकार आभाळे आदी विद्यार्थ्यांनी यश मिळवत शिष्यवृत्ती पटकावली असल्याने संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी , अध्यक्षा शैलजा पोखरकर , कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी , सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी , प्राचार्य शिवाजी धुमाळ, उपप्राचार्य सुजल गात , पर्यवेक्षक मंगेश खांबेकर , एस बी शिंदे यांचेसह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . ता यशाबाबत अर्णव यास विचारले असता , आपल्या यशाबाबत विद्यालयात सातत्याने घेतलेले सराव व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन सर्वांत मार्गदर्शक ठरल्याची भावना त्याने व्यक्त केली .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button