इतर

अमेरिकेत समर्थ सेवामार्गाच्या ‘विश्वशांती महोत्सवा’स उस्फूर्त प्रतिसाद…………

………………..

अकोले प्रतिनिधी

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या विद्यमाने अमेरिकेमध्ये “श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सव 2022” चे आयोजन  परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे मार्गदर्शनाने आणि आदरणीय नितिनभाऊ मोरे यांचे प्रमुख  उपस्थितित करण्यात आले असून सर्वत्र या महोत्सवास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.       

   जगापुढील विविध समस्यांचे निराकरण होऊन जागतिक शांतता नांदावी आणि अखिल मानव जातीच्या उन्नती साधावी यासाठी  4 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर 2022 या कालावधीत यू एस ए मध्ये विविध ठिकाणी – बोस्टन, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, डेट्रॉइट, डलास, अटलांटा, रैले, सैन जोस, लॉस एंजिल्स येथे “विश्वशांती महोत्सव” साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाला अमेरिकेमधील रहिवासी मोठ्या संख्येने उत्साहाने उपस्थित आहेत.

 यूएसएचे अनेक मान्यवर – स्टेट हाऊसचे प्रतिनिधी, परिषदांचे सदस्य, शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, विविध कॉर्पोरेट गटांचे कंट्री हेड इत्यादींनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमांना हजेरी लावली. स्थानिक दूरचित्रवाणी वाहिन्या, एफएम रेडिओ आणि वृत्तपत्रे यांसारख्या प्रसारमाध्यमांच्या विविध माध्यमांतून विश्वशांती महोत्सवाविषयी आयोजक – सेवा मार्गाचे सेवेकरी सातत्याने संदेश देत आहेत.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या ‘देश विदेश अभियान’ विभागाने आयोजन केलेल्या या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांनी नृत्य व भक्तिगीते, स्वामी जप, स्तोत्रे व मंत्रांचे पठण, मन:शांती साठी – ध्यान, ढोल ताशाच्या गजरात श्री स्वामी समर्थ महाराजाँच्या पादुकांची मिरवणूक अश्या विविध उपक्रमात मोठया संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान स्वामी भक्तांची स्वयं-शिस्त आणि स्वामी सेवामार्गा साठीचे समर्पण हे वाखाणन्याजोगे होते.

अमेरिकेतील मिशिगन राज्यात 6 नोव्हेंबर 2022 रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर, डेट्रॉईट येथे आदरणीय नितीनभाऊं मोरेंच्या च्या हस्ते नवीन साप्ताहिक सेवा केंद्र सुरू झाले. या समारंभात आदरणीय नितीनभाऊं मोरे यांनी अमेरिकेतील मिशिगन येथील स्वामी भक्तांना मार्गदर्शन केले आणि नवीन सेवा केंद्रासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान उपस्थित भाविकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी मोफत आध्यात्मिक समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्री. अविनाशदादा रचमाळे, सीईओ आणि अध्यक्ष, लक्षेशोर ग्लोबल कोऑपरेशन, मिशिगन, सौ. हेमाताई रचमाळे, सोशल ऐक्टिविस्ट, सौ. पद्मा कुप्पा, सदस्य- मिशिगन हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव आदि मान्यवर आवर्जुन उपस्थित होते. त्यानी ‘श्री गुरुपीठाने’ – यूएसए मध्ये नियमितपणे असे कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती केली. या कार्यक्रमा दरम्यान – श्री गुरुपीठाच्या माध्यमातून सुरु असलेले  उदात्त सामाजिक कार्य, प्रकाशन, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, पर्यावरण – विज्ञान इत्यादी विविध सेवा मार्गाच्या स्टॉल्सचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. महोत्सवात अनेक स्वामी भक्तांनी स्वामींच्या पादुका पूजन करुन आशीर्वाद घेतले.

विश्वशांती महोत्सवा अंतर्गत नितिभाऊ मोरे 

डलास (टेक्सास), 

अटलांटा (जॉर्जिया), -रैले (नॉर्थ कॅरोलिना),  बे एरिया (कॅलिफोर्निया),  लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया)या महानगरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातून अमेरिकेत आज 40 लाख लोक नोकरी धंद्याच्या निमित्ताने आले असून या भारतीयांप्रमाणेच स्थानिक लोकांचाही ओढा सेवामार्गाकडे वाढत असून नवनवीन ठिकाणी नवीन समर्थ केंद्राची मागणी वाढत असल्याची माहिती यनिमित्ताने नितीनभाऊ मोरे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button