क्रांतिकारक राया ठाकर यांचे स्मारका साठी सरकारने निधी द्यावा -केंद्रीय मंत्र्यांकडे केली मागणी!

नाशिक –आद्य क्रांतिकारक राया ठाकर यांचे स्मारक होण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचे निवेदन। आज केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री। ना.फगण सिह कुलस्ते यांना देण्यात आले
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुष,देशभक्त,स्वातंत्र्य सेनानी होवून गेले त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाजातील आदिवासी अध्यक्रांतीकारक राया ठाकर हे एक होते त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य इंग्रजंविरुद्ध लढले, त्यांचे स्मारक महाराष्ट्र राज्यात नाशिक जिल्ह्यात बोर्ली ( ता इगतपुरी )येथे होण्यासाठी आपल्या माध्यमातुन सरकारकडून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राया ठाकर फाऊंडेशन चे वतीने आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी इंदोर मध्यप्रदेश येथे केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री ना. फगणसिंह कुलस्ते यांचे कडे केली
आपण आदिवासी समाजातील क्रांतीकारक राया ठाकर यांचे स्मारक होण्यासाठी निधी उपलब्ध करून आदिवासी समाजाचा सन्मान करावा अशी सकारात्मक चर्चा यावेळी करण्यात आली
यावेळी राया ठाकर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री पांडूबाबा पारधी. राजुभाऊ गांगड. श्री सिताराम भाऊ गावंडा,.श्री.दौलतभाऊ मेमाणे. आकाश भले. चिराग मेमाणे यावेळी उपस्थितीत होते.