पूर्व उच्च प्राथ. शिष्यवृत्ती परिक्षेत अकोले तालुक्याने मिळवला तृतीय क्रमांक

अकोले प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतलेल्या इ.५वी शिष्यवृत्ती परिक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याने जिल्हयात तिसरा क्रमांक प्राप्त करून नेत्रदिपक यश मिळवले आहे. इ.५वी व आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अशा प्रकारची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करत असते. गेल्या मंगळवारी ( ता. ८नोव्हें. २०२२ ) या परिक्षेचा अंतिम निकाल लागला.
यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी अकोले तालुक्यातील पात्र विदयार्थ्यांचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचाही यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी सन्मान केला. अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली असल्याचे व जिल्हा परिषदेच्या शाळा कोणत्याही बाबतीत कमी नाहीत.असे पाटील यांनी सांगितले.
अकोले तालुक्यातील विदयार्थी व शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ यांनी प्रास्ताविकात अकोले तालुक्याची शैक्षणिक गुणवत्ता व यशाची परंपरा सांगितली.
यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक बाळासाहेब तोरमड, विक्रम गायकर, संजय गोर्डे, भागवत कर्पे, चैताली लोंढे, खतोडे सर, भाऊसाहेब चासकर, संभाजी वैद्य, अनिल मोहिते व इतर मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी श्री. दोरगे यांनी केले. आभार विस्तार अधिकारी जालिंदर खताळ यांनी मानले. यावेळी अनेक सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रप्रमुख उपस्थित होते.