राष्ट्रीय चर्चासत्रासाठी संदीप वाकचौरे यांची निवड

संगमनेर प्रतिनिधी
देशभरामध्ये शिक्षण क्षेत्रात जीवन कौशल्य संदर्भाने अमलबजावण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू आहेत त्या संदर्भात देशातील विविध राज्य सरकार व सामाजिक संघटनेच्या वतीने सुरू असणाऱ्या प्रयत्नांच्या संदर्भाने दिल्ली येथे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहेत त्या चर्चासत्रात सहभाग घेण्यासाठी संदीप वाकचोरे यांची निवड करण्यात आली आहे. निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
देशभरामध्ये सध्याच्या परिस्थितीत शालेय शिक्षणामध्ये जीवन कौशल्य समाविष्ट आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे व त्या संदर्भातील गरजा, परिणामकारकता, अभ्यासने यासंदर्भात वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध उपक्रम सुरू आहेत .त्यासाठी देशातील विविध उपक्रमा संदर्भात एकत्रित परिस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्य सरकार व देशातील 18 हून अधिक जीवन कौशल्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्या वतीने चर्चास्तराचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातून शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून संदीप वाकचौरे यांची निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी राज्यातील विविध शैक्षणिक प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. पाठ्यपुस्तक निर्मिती ,प्रशिक्षण साहित्य निर्मिती, राज्य स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. त्यांची सात पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. या निवडीबद्दल सहसंचालक रमाकांत काटमोरे, उपसंचालक विकास गरड, विद्याधर शुक्ल, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील , उपशिक्षणाधिकारी श्री साठे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षण अधिकारी सुवर्ण फटांगरे आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहेत