राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा संगमनेरात निषेध

संगमनेर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजां विषयी बेताल वक्तव्य करून त्यांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांचा आज संगमनेरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर शिवसेना, तालुका शिवसेना व सर्व अंगीकृत संघटनांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सारखी धोती व टोपी असलेली वेशभूषा करून छत्रपती शिवाजी महाराजांपुढे त्यांना हजार वेळा नतमस्तक करण्यात आले व माफी मागून प्रतीकात्मक निषेध व्यक्त करण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्य वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काल सकाळी संगमनेरात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना युवा सेनेतील पदाधिकारी व महिला पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर संगमनेर शिवसेनेच्या वतीने जहरी टीका करून वार्निंग देण्यात आली. जर पुन्हा आपण अशा प्रकारचे बेताल वक्तव्य केले तर तुम्हाला महाराष्ट्रात छत्रपती प्रेमी मावळे शिवसैनिक फिरू देणार नाही. तुमचं धोतर फेडल्याशिवाय राहणार नाही. अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी शिवसेना शहरप्रमुख अमरभाऊ कतारी, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे उपजिल्हा प्रमुख मुजीबभाई शेख, नरेश जी माळवे, गोविंद नागरे यांच्या भाषणातून उमटल्या व त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
यावेळी भाऊसाहेब हासे, उपजिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख, नागपूर संपर्कप्रमुख नरेश जी माळवे, शिवसेना शहरप्रमुख अमरभाऊ कतारी, युवासेना शहर प्रमुख अमोल डुकरे, शिवसेना उपशहर प्रमुख वेणूगोपाल लाहोटी, दीपक वनम, इम्तियाज शेख, फैसल सय्यद, महिला आघाडी सुरेखाताई गुंजाळ, आशाताई केदारी, संगीताताई गायकवाड तसेच युवा सेनेचे गोविंदभाऊ नागरे, सुदर्शन इटप, अक्षयभाऊ बिल्लाडे, फरोज कतारी, संकेत खुळे, वैभव अभंग, संभव लोढा, पठार भागाचे ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ फटांगरे, एस.पी रहाणे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश खेमनर, युवासेना विधानसभा प्रमुख राजाभाऊ सातपुते, अक्षय गाडे, लक्ष्मण सोन्नर, निलेश रहाणे, शिवसेना शाखाप्रमुख अजीजभाई मोमीन, विद्यार्थी सेनेचे सचिन साळवे, कार्यालयीन प्रमुख बंडू म्हाळस, रिक्षासेनेचे बढे, भगवान पोपळघट, माधव फुलमाळी, शिवसेना कार्याध्यक्ष दीपकभाऊ साळुंखे, शहर समन्वयक असिफभाई तांबोळी, अक्षय गुंजाळ, नारायण पवार, निलेश गुंजाळ, प्रकाश चोथवे, विभाग प्रमुख विजय भागवत, जयदेव यादव, दानिश पारवे, अल्ताफ शेख, प्रतीक मिसाळ आदी उपस्थित होते.